


पिंपरी, ता.३१: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुधारित विकास आराखड्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून या विकास आराखड्यात मोहननगर , रामनगर जुन्या विकास आराखड्या खूप मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली असून जुन्या डीपी मधील रस्ते वाढवण्यात आले आहेत.

तसेच अनेक ठिकाणी नागरी वस्तीतून रस्ते नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये काही मोठ्या लोकांच्या पूर्वीच्या आरक्षणाच्या जागा वगळण्यात आल्या आहेत.
त्यामुळे या सर्व झालेल्या बेकायदेशीर कामाला मोहननगर , रामनगर दत्तनगर , विद्यानगर महात्मा फुलेनगर परिसरातील नागरिकांना एकत्रित करून या बोगस डीपी प्लॅनलासाठी देण्यात आलेल्या ६० दिवसाच्या कालावधीमध्ये अभ्यासपूर्ण ऑब्जेक्शन घ्यावे लागणार आहे.
……..
ऑब्जेक्शन मोठ्या संख्येने नोंदवावे लागणार आहेत . त्यामुळे आपण मोहन नगर रामनगरवाशियांनी एकत्रित येऊन पुढील रणनीती ठरवून या तसेच या अन्याय विरोधात आंदोलनाची दिशा हि ठरवावी लागेल. त्यामुळे आपण उद्या रविवार १ जून २०२५ रोजी सायं ७.०० श्री दत्त मंदिर चौक मोहननगर येथे एकत्रित येऊन पुढील दिशा ठरवू तरी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढील नियोजनासाठी उपस्थित राहावे ही विनंती.
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
