


पिंपरी, दि. २७: ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारक पिंपरी या ठिकाणी २७ मे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनविश्वरत्न,महामानव.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहराध्यक्ष बौद्धाचार्य बापूसाहेब गायकवाड यांनी सामूहिक त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना घेतली.यावेळी बापूसाहेब गायकवाड, बाळासाहेब रोकडे,दत्ता ठाणांबिर,संतोष जोगदंड,मनोज गजभार,बाबासाहेब वाघमारे,प्रमोद शेरे,राम भंडारे,रवी कांबळे,सुभाष जाधव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विलास साळवी, अभिजीत डोळस,मुकेश जगताप,विकास गायकांबळे आदी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️