Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट

suwarna gaware 21/05/2025
abdc1b17-d366-454b-998a-f5e8f5e1283a
Spread the love

पिंपरी, २१ मे २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सुरू केलेले ‘सावली’ बेघर निवारा केंद्र शहरातील गरजू, बेघर व असहाय्य नागरिकांसाठी एक मोठा आधार बनले आहे. राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीने नुकत्याच केलेल्या निरीक्षणामध्ये हे केंद्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरले आहे.

नागरी बेघरांना निवारा या घटकाच्या प्रगतीचे सनियंत्रण करण्यासाठी शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आले. या समितीने त्रयस्थ संस्थेद्वारे राज्याच्या विविध शहरात असणाऱ्या निवाऱ्यांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्रिशरण एनलायनमेंट फाऊंडेशन या संस्थेने निवारा निरीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालामध्ये सर्वोत्कृष्ट ५ निवाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सावली बेघर निवारा हे केंद्र प्रथम क्रमांकावर आहे. तर ग्रेस बेघर निवारा (बृहन्मुंबई महानगरपालिका), शहरी बेघर निवारा (अंबरनाथ नगरपरिषद) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे. चौथ्या क्रमांकावर संत गाडगेबाबा बेघर निवारा (अकोला महानगरपालिका) आणि पाचव्या क्रमांकावर जिव्हाळा बेघर निवारा (बीड नगरपरिषद) आहे.

वर्ष २०२० मध्ये झाली केंद्राची सुरुवात

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत २०१९ मध्ये त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण १५२ बेघर लाभार्थी आढळून आले. त्यानंतर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ऑक्टोबर २०२० मध्ये सावली निवारा केंद्र सुरू करण्यात आले. पिंपरी भाजी मंडईच्या पहिल्या मजल्यावर १९ हजार ८६ चौरस फुट जागेवर हे केंद्र उभारण्यात आले असून याची निवास क्षमता १११ व्यक्तींपर्यंत आहे. हे केंद्र रेल्वे स्थानकापासून केवळ अर्धा किलोमीटर आणि बसस्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.

सावली निवारा केंद्रात पुरुष, महिला, बेघर कुटुंबे आणि दिव्यांग व्यक्तींकरिता स्वतंत्र व्यवस्था व सुरक्षित सोयी पुरविल्या आहेत. निवारा केंद्रामध्ये एकूण २३ रुम असून बेघर कुटुंबांसाठी ७ रुम देखील उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी ५ स्नानगृहे व ६ शौचालये, महिलांसाठी २ स्नानगृहे व ६ शौचालये, तसेच दिव्यांगांसाठी विशेष स्नानगृह व शौचालयाची सोय करण्यात आली आहे. स्वच्छता, आरोग्य व सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आले असून गरम पाण्याची सोय, पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्वयंपाकगृह, लॉकर्स, मनोरंजनासाठी टी.व्ही., वृत्तपत्रे, सीसीटीव्ही व अग्निशमन यंत्रणा अशी विविध सुविधा या केंद्रामध्ये आहे. या केंद्राचे व्यवस्थापन “रिअल लाईफ रिअल पिपल” या सामाजिक संस्थेकडे सोपवले आहे. ही संस्था दर आठवड्याला शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानक, उड्डाणपूल, धार्मिक स्थळे, मेट्रो स्थानके इत्यादी ठिकाणी गस्त घालून बेघर व्यक्तींचे सर्वेक्षण करते. समुपदेशनाद्वारे त्या व्यक्तींना निवारा केंद्रात आणण्याचे काम देखील ही संस्था करते.
……

केंद्रामध्ये राबवले जातात विविध उपक्रम

निवारा केंद्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी, आधार कार्ड नोंदणी, जनधन योजनेअंतर्गत बँक खाती उघडणे, बचत गट स्थापन करणे, लसीकरण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, असे विविध उपक्रम राबवले जातात. भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, कर्वे इन्स्टिटयूट ऑफ सोशल सर्व्हिसेस यासारख्या संस्थांमार्फत विविध सामाजिक उपक्रम येथे घेतले जातात.
…….

बेघर व्यक्तींच्या पुनर्वसनाला दिले जाते प्राधान्य

बेघर व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी देखील या केंद्राचे काम सुरू आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून आतापर्यंत सुमारे ३१२ व्यक्तींचे त्यांच्या मूळ घरी किंवा नातेवाईकांकडे पुनर्वसन करण्यात आले आहे. ५० व्यक्तींना पुनर्वसन करण्यासाठी इतर संस्थेकडे पाठवण्यात आले आहे. १६५ व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
…….
कोट

सावली निवारा केंद्र हे केवळ गरजू व बेघरांसाठी निवासाचे ठिकाण न राहता त्यांच्या सशक्तीकरणासाठी कार्य करणारे एक प्रेरणादायी केंद्र बनले आहे. सुरक्षितता, स्वच्छता, मानवी सन्मान आणि सामाजिक समावेश या मूल्यांवर आधारित या केंद्राची कार्यपद्धती आहे. हे केंद्र राज्यातील सर्वोत्कृष्ट ठरले असून येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ……..
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 51
Tags: #savali nivara Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक :- शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे
Next: असंवेदनशील वीज वितरण अधिकाऱ्यामुळे नागरिक २६ तास अंधारात

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.