


पिंपरी, ता. १३: डाॅ. डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स च्या वतीने आयोजित भारतीय नृत्य शैली वर आधारित आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद नुकतीच डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ मेडिकल कॉलेज ऑडिटोरियम येथे उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.

यावेळी रंगमंचावर प्रमुख पाहुण्या डॉक्टर संध्या पुरेचा ,अध्यक्षा संगीत नाटक अकादमी , सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली, डॉ भाग्यश्री ताई पाटील ,प्र कुलगुरू , डाॅ.डी.वाय. पाटील विद्यापीठ, डॉक्टर रेखा डीन मेडिकल कॉलेज ,डॉ वत्सला स्वामी संचालक ,आयक्यू एसी, भावना शाह,सचिव,भरता कॉलेज, मुंबई व डॉक्टर नंदकिशोर कपोते संचालक, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी डॉक्टर नंदकिशोर कपोते यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर प्रमुख पाहुण्या डॉक्टर संध्या पुरेचा यांचा पुष्पगुच्छ व शाल स्मृतिचिन्ह देऊन डॉ भाग्यश्री ताई पाटील यांनी सत्कार केला यानंतर डॉक्टर संध्या पुरेचा यांनी भरतनाट्यम नृत्या विषयी अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले डॉक्टर संध्या पुरेचा यांच्या शिष्या व भरता कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कल्चर,मुंबई च्या विद्यार्थिनींनी सुंदर भरतनाट्यम नृत्य सादर केले.
विद्यार्थिनींनी सादर केलेल्या खेळ मांडीयेला आणि विठू नामाचा गजर या नृत्यांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्यांनी तिल्लाना सादर केला यानंतर डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी व डॉक्टर नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी कथक नृत्य सादर केले त्यानंतर गुरु स्वाती दैठणकर यांच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम नृत्य तर निकिता मोघे यांच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केले.
सर्व कार्यक्रमास रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रतिमा चव्हाण यांनी केले यानंतर अपर्णा पानसे ,नेहा जोशी, शिल्प अंतापुरकर, प्रतिमा चव्हाण, अनुष्का सामंत , भावना सामंत यांनी विविध नृत्य विषयांवर शोध निबंध प्रस्तुत केला. रसिकांच्या प्रचंड प्रतिसादाने संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय झाला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
