


पिंपरी, दि. ५ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख मा श्री हरेश आबा नखाते यांच्या वाढ दिवसा निमित्त आबा श्री चषक बॅडमिंटन लीग स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. गेली दहा दिवस या स्पर्धा चालू होत्या या कालावधीमध्ये धनाजी येळकर , हरीश आप्पा मोरे शिव चरित्रकार निलेश मरळ देशमुख, शामराव काळे युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, सचिन काळे, बाळासाहेब तांबे, विलास नढे, छावा संघटनेचे मनोज अण्णा मोरे , सचिन लिमकर, रामभाऊ सूर्यवंशी ,संजय कांबळे ,अण्णा खोबरे ,अक्षय बोडके या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली.

ह ,अ गटातील प्रथम क्रमांकाचे विजेते दिग्विजय नढे , आनंद देवडकर ,उपविजेते सचिन पवार ,अनिल पळसे ब गटातील विजेते दीपक भिलारे प्रदीप थोपटे उपविजेते नितीन जाधव गुंडाप्पा तेलंग क गटातील विजेते संजय हिवाळे , नरेंद्र माने , उपविजेते संजय पगारे, शिवाजी गोजे यांनी स्पर्धेत बाजी मारली .

स्पर्धेचा बक्षीस समारंभ शिवसेना शहरप्रमुख संजोगभाऊ वाघेरे पाटील , बाबासाहेब त्रिभुवन , दिलीप काळे , नरेश आप्पा खुळे, गोपाळ माळेकर बाळासाहेब नढे ,माऊली मलशेट्टी , योग गुरु सुरेश विटकर , दस्तगीर मणियार , गोरख कोकणे , गोविंद वलेकर , नरेंद्र माने ,संजय नरळकर ,एकनाथ मंजाळ ,नेताजी नखाते ,अशोक चव्हाण ,संतोष जगताप ,संभाजी नढे ,दीपक जाधव यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पाडला.

या कार्यक्रमास पवना हेल्थ क्लब चे गार्डन ग्रुप धर्मवीर संभाजी महाराज गार्डन ग्रुप बाबास्वामी योगा ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पगारे यांनी केले व उपस्थित सर्वांचे आभार हरेश आबा नखाते यांनी मांनले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
