Skip to content
23/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • जिजाऊ रथयात्रेचे बुधवारी शहरात होणार जोरदार स्वागत.
  • Daily Breaking News
  • Cultural

जिजाऊ रथयात्रेचे बुधवारी शहरात होणार जोरदार स्वागत.

suwarna gaware 28/04/2025
169fb02f-1b49-44bc-9045-ff60a3cadf77
Spread the love

शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेडची जय्यत तयारी.

विविध सामाजिक संघटना रथयात्रे च्या स्वागतास सज्ज.

पिंपरी, ता. २८: मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ही रथयात्रा बुधवारी 30 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड शहरात दाखल होत आहे.

या रथयात्रेचा मुख्य उद्देश सामाजिक समता व सलोखा निर्माण करणे, संविधानाचे महत्व समाजास पटवून देणे,मराठा बहुजन समाजात जागृती निर्माण करणे. सध्या जातीयवाद,धर्मवाद, गुन्हेगारी,भ्रष्टाचार,धार्मिक आणि राजकीय उन्माद यासह अनेक कारणांनी सामाजिक एकता,सलोखा धोक्यात आला आहे.

समाजा- समाजामध्ये संशयाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकरी, कामगार,युवक,युवती,विद्यार्थी तसेच समाजातील सर्वच घटकांशी संवाद साधून राष्ट्र उभारणीच्या कार्यात सामाजिक ऐक्याचा जागर करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून मराठा जोडो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.


संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर व मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांच्या नेतृत्वात सदर रथयात्रेची सुरवात 18 मार्च रोजी भोसले गढी, वेरूळ येथून झाली आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून ही रथयात्रा बुधवारी 30 एप्रिल रोजी पुणे जिल्ह्य़ात येत आहे.

बुधवार दि. ३० एप्रिल २०२५ रोजी दुपारी तीन वाजता जिजाऊ रथयात्रा डांगे चौक थेरगाव येथे येणार आहे. यावेळी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. ही रथ यात्रा पूर्ण शहरात फिरणार असून स्वागत व जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी डांगे चौक येथे दुपारी ३ वाजता खासदार श्रीरंग आप्पा बारणे,आमदार शंकर जगताप,माजी नगरसेवक राहुल कलाटे तसेच दुपारी ३.३० वा. चाफेकर चौक चिंचवड येथे विधान परिषद आमदार उमा खापरे,माजी नगरसेवक सुरेश भोईर,राजेंद्र गावडे,अनंत कोऱ्हाळे,अश्विनी चिंचवडे याचप्रमाणे सायं. ४.१५ वाजता पेट्रोल पंपाजवळ,चिंचवड स्टेशन येथेआमदार अमित गोरखे,माजी नगरसेवक मारुती भापकर,शरद थोरात यांच्या उपस्थितीत रथ यात्रेचे स्वागत व जिजाऊंना अभिवादन करण्यात येणार आहे.


नंतर रथयात्रा मोरवाडी अजमेरा मार्गे सायंकाळी ५ वाजता नेहरूनगर येथे येणार आहे.या वेळी माजी महापौर वैशाली घोडेकर,माजी नगरसेवक राहुल भोसले,माजी नगरसेवक समिर मासुळकर तसेच सायं. ६ वा. पी.सी.एम.टी.चौक भोसरी येथे रथयात्रेचे आगमन होणार आहे. या वेळी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे,माजी नगरसेवक रवि लांडगे,विलास मडेगरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ६.३० वाजता छ.शिवाजीमहाराज पुतळा चौक लांडेवाडी येथे माजी आमदार विलास लांडे,माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांचे वतीने जिजाऊंना अभिवादन करून रथयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच अग्निशामक केंद्र, बुद्ध विहार चौक संततुकारामनगर येथे सायंकाळी ७.१५ वाजता माजी महापौर योगेश बहल,माजी नगरसेवक यशवंत भोसले,बबनराव गाडवे,माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत,सुजाता पाडाळे,मुक्ता पडवळ,व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रथयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.

रात्री आठ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात रथयात्रेचे आगमन होणार आहे.यावेळी समारोपीय सभा होणार असून रथयात्रेचे प्रमुख संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर व मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे मार्गदर्शन करणार आहेत.सभेचे अध्यक्ष जनचळवळीचे जेष्ठ नेते मानव कांबळे आहेत. या वेळी विधान सभा उपाध्यक्ष नामदार आण्णा बनसोडे,माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम,शिवसेना (उबाठा) चे शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे,मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले,छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील,अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धिकभाई शेख,क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग परचंडराव,बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रथयात्रेच्या नियोजनासाठी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे,डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक षरिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव,मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा.रामकिशन पवार,अॅड लक्ष्मण रानवडे,वसंत पाटील, वाल्मिक माने,प्रकाश बाबर,दिलीप गावडे,अशोक सातपुते,मोहन जगताप,विजय शिंदे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार,संघटक मनोज गायकवाड,सिद्धार्थ कोंढाळकर, शहराध्यक्ष सतिश काळे,प्रवीण कदम,नकुल भोईर,श्रीकांत गोरे,सदाशिव लोभे,आप्पा चांदवडे,विवेक गायकवाड तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मनिषा हेम्बाडे,शहराध्यक्षा सुलभा यादव,विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे,वृषाली साठे,माणिक शिंदे,शितल घरत,अश्विनी पाटील,हेमा ग्यानी,उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 92
Tags: #jijau #maratha seva sangh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: मोहननगर येथे श्री वेंकटेश्वरा ट्रस्टचा २३ वा बालाजी मंदिर वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
Next: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सेवा हक्क दिनानिमित्त शपथ…

Related Stories

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.