Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सेवा हक्क दिनानिमित्त शपथ…
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सेवा हक्क दिनानिमित्त शपथ…

suwarna gaware 28/04/2025
ab28cb0f-c888-4d59-b13c-fdb8ed2c8e85
Spread the love

सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रमाला सुरवात…

पिंपरी, २८ एप्रिल २०२५ : ” आम्ही गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, आम्ही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी आम्हाला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी कटीबद्ध राहू. आम्ही सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक ती पावले उचलू तसेच आम्ही नागरिकांना उक्त कायद्याने प्रदान केलेल्या सेवेच्या हक्कांचा आदर ठेवून व सेवा भाव ठेवून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करू ” अशा आशयाची शपथ आज महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये आज प्रशासकीय भवनात महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या सेवा हक्का हक्काबाबत जागरूकता निर्माण व्हावी याकरिता महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसेवा सेवा हक्काची शपथ घेतली.

   यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी साधना बोर्डे, मुख्य लिपिक मोरे, अनिल कुऱ्हाडे यांच्यासह महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. 
   राज्यातील नागरिकांना सर्वोत्तम सेवा सुविधा देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने राज्यात आज  (२८ एप्रिल) रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार प्रशासन सेवेत नागरी सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

   यामध्ये उपक्रमांमध्ये मुख्य प्रशासकीय कार्यालयांसह,क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर कार्यालयांमध्ये सेवा हक्क दिनानिमित्त सेवेची बांधिलकी जपणूक करण्याची शपथ अधिकारी वर्गाना देण्यात आली आहे. दरम्यान महापालिकांच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे आरोग्य विभागामार्फत गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे येथे सेवा हक्क नियमांचे फलक घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नागरिक भागांमध्ये पथनाट्याद्वारे सेवा तसेच समाज विकास विभागाच्या वतीने झोपडपट्टी व बचत गट यांच्यामध्ये समूह संघटकामार्फत सेवा हक्क अधिनियमाची माहिती देण्यासाठी मेळावे व बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

लोकसेवा हक्क दिन शपथ…

कोट –
लोकसेवा हक्क दिन साजरा करतांना आपण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा संकल्प करून आपल्या नागरिकांना सेवा देण्यासाठी सदैव तयार राहू. आजच्या लोकशाही सेवा हक्क दिनानिमित्त नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्याची शपथ घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देशात नंबर एक बनवूयात –

विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
————–
महापालिका विविध विभागामार्फत एकूण 57 सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरी सुविधा केंद्रामार्फत सेवा देते. याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालय व मुख्य कार्यालयात तसे माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महापालिका क्षेत्रातील कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात नागरिक संपर्क करु शकतात.

राजेश आगळे, उपायुक्त, नागरी सुविधा केंद्र

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 66
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: जिजाऊ रथयात्रेचे बुधवारी शहरात होणार जोरदार स्वागत.
Next: पीसीएमसीच्या उद्यानांमध्ये पहिल्यांदाच कॅशलेस प्रवेश : १० उद्यानांमध्ये पीओएस मशिन्स कार्यान्वित

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.