Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरल्यास मिळणार १०% सूट आणि इतर कर सवलती
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरल्यास मिळणार १०% सूट आणि इतर कर सवलती

suwarna gaware 17/04/2025
IMG_0714
Spread the love

पिंपरी, १७ एप्रिल २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता नेहमीप्रमाणे मालमत्ता कर सवलतीच्या विविध योजना जाहीर केल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार ८६३ मालमत्ता असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त कर संकलन करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन सुरू केले आहे.

नागरिकांना कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासाठी ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास ५ टक्के आणि तो ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरला तर अधिक ५ टक्के अशी एकूण १० टक्के सवलत मिळणार आहे.

या सवलतीचा लाभ घेऊन आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये ३ लाख ४९ हजार ८३८ मालमत्ताधारकांनी ४३५ कोटी मालमत्ता कर वेळेत भरला आहे. सबब या सवलतींचा लाभ घेऊन मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने आपला कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वर नमूद कर सवलती व्यतिरिक्त महानगरपालिकेतर्फे करदात्यासाठी अन्य विविध सवलती जाहीर केल्या आहेत. महानगरपालिका हद्दीत महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगांना ५० टक्के व माजी सैनिकांना मालमत्ता करात १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतींचा लाभ ३० जून २०२५ पर्यंत घेता येणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांनी या सवलतींचा लाभ घेतला आहे, त्यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सवलतींचा लाभ घेण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

अशी आहे मालमत्ता कर सवलत योजना

  • ३० जून २०२५ पर्यंत आगाऊ तसेच ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत
  • फक्त महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेस ३० टक्के कर सवलत
  • ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस ५० टक्के सवलत
  • ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत
  • कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट संकल्पना राबविणाऱ्या निवासी मालमत्तांना सामान्य करात ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत
  • शैक्षणिक इमारतींमध्ये ऑनसाईट कंपोस्टिंग, झिरो वेस्ट, झिरो वेस्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग, झिरो वेस्ट सौर ऊर्जा यासंकल्पना राबवणाऱ्या मालमत्तांना सामान्य करात ४ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत
  • शौर्य पदक धारक व माजी सैनिक, विधवा पत्नी, अविवाहित शहीद, सैनिक यांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत
  • सलग तीन वर्षे मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्य कर रकमेवर २ टक्के सवलत
    …….

कोट

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने २०२५-२६ या वर्षाकरिता मालमत्ता करामधील सवलत व सूट जाहीर केल्या आहेत. या मालमत्तांची बिले देखील ऑनलाइन जनरेट झाली आहेत. ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना किमान दहा टक्के सामान्य करावर सवलत मिळणार आहे. ३० जून २०२५ पर्यंत कर भरून विविध कर सवलीतीचा लाभ घेता येणार असल्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी आपला कर ३० जून पूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरून या सवलतींचा लाभ घ्यावा.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कोट

पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मालमत्ता कर वेळेत भरून सवलतींचा लाभ घेतला, ज्यामुळे ९६६ कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात महापालिकेला यश मिळाले. यावर्षीही करदात्यांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता कर लवकर भरावा.

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 43
Tags: #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने दुचाकी हातगाडीवर आंदोलन
Next: पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीची भव्य आढावा बैठक शिवसेना भवन येथे उत्साहात संपन्न…

Related Stories

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 1

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 2

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 3

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 4

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 5

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.