


पिंपरी, ता. १७: दापोडी फुगेवाडी येथील आनंदवन कुष्ठ वसाहत या ठिकाणी कुष्ठ पीडित व अपंग रूग्णांची वसाहत वसलेली असून अशा रूग्णाकरीता महाराष्ट्र राज्य शासनाकडून पुर्वीपासून दरमहा ६० रूपये संजय गांधीं पेन्शन असताना आज १५०० रूपये आहे.

परंतु गेल्या माहे नोव्हेंबर २०२४ महिन्यापासून जवळपास ९० ते १०० विधवा अपंग तसेच कृष्ठपीडीत रूग्णांना ही योजना बंद झालेली आहे.अशा गरीब व लाचार रूग्णांवर सध्या उपासमारीने हाल होत असताना संबंधित निगडी व पुणे तहसीलदार कार्यालयातील अधिकारी वर्गाकडून आधारकार्ड लिंक करणे, संपूर्ण जन्मदिनांक आधारकार्डवर असणे,आधारकार्ड वर मोबाईल नंबर असणे, बॅक आधार लिंक पाहिजे नाही तर दरमहा संजय गांधी बंद होणार अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
तरी अंध अपंग लाचार कृष्ठपीडीत रूग्णांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता त्याचप्रमाणे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता अशा रूग्णांना त्वरीत संजय गांधी निराधार पेन्शन योजना पुर्ववत करणे कामी योग्य त्या पर्यायाचा विचार करून त्यांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी अनिल कांबळे.उपाध्यक्ष, नंदनवन कुष्ठ पिडीत बहुउद्देशीय संस्था, जितेंद्र चव्हाण. अध्यक्ष, महाराष्ट्र कुष्ठ पिडीत संघटना यांनी केली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
