


पुणे, ता. १६: अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी केली गेली. या जयंती कार्यक्रमात अमेरिकन तत्वज्ञ डॉ. कॉर्नल वेस्ट यांनी कार्यक्रमाचे बीजभाषण केले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बिश्नू पेरियार, बोस्टन विद्यापीठाचे पीएच. डी. स्कॉलर दादासाहेब तांडले, राम गौतम, कॅप्टन विजय बांबोळे, डॉ. सलाम शेख, ॲड. दीपक चटप, इशान परमार यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती.

कोलंबिया विद्यापीठात लेहमन ग्रंथालयात हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात विकास तातड यांना न्यू जर्सी महापौर यांचे प्रॉक्लेमेशन देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी आई-वडिलांसह हा बहुमान स्वीकारला. या जयंती कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, न्याय आणि शिक्षणाच्या विचारांना उजाळा मिळाला.
कार्यक्रमाची सुरवात त्रिशरण व पंचशीलाने करण्यात आली. लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे आपल्या खास शैलीतून संविधानिक मूल्यांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. विपीन तातड यांच्या रॅपने कार्यक्रमाला रंगत आली. नवीन कुमार यांच्या कविता लक्षवेधी ठरल्या.
मुख्य संयोजक विकास तातड यांनी प्रास्ताविक केले. कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जयंती आयोजनाचा इतिहास आणि विद्यार्थ्यांना सोसावा लागणारा जाती आधारित भेदभाव संरक्षित कॅटेगरी म्हणून समावेश करून घेताना करावा लागलेला संघर्ष मांडला. विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून कोलंबिया विद्यापीठात सातत्याने जयंती साजरी केली जात असून या कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेनदिवस वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख वक्ते डॉ. सलाम शेख यांनी त्यांचे पूर्वज भारतात बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी होते. बाबासाहेबांचा विचार अमेरिकेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहिचविण्यासाठी कार्यरत राहील असे नमूद केले. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांनी एक शाळा सुरु केली असून तिथे देखील बाबासाहेबांची जयंती साजरी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ॲड. दीपक चटप म्हणाले की, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या लोकशाहीच्या रक्तवाहिन्या आहेत. या सामान्य जनतेसाठी शोषक ठरू नये म्हणून विविधता जोपासणे आवश्यक वाटते. भारतीय संविधानाने दिलेला मार्ग धोरणकर्ते स्वीकारत आहेत किंवा नाही? याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करता कामा नये. बाबासाहेबांच्या समताधारित विचारांतून येणारी पिढी सकारात्मक बदल घडवू शकते. अमेरिकेतील मानवी हक्कांची लढाई, हंगेरीतील रोमा, जागतिक कामगार संघटनेची धोरण आणि जगातील दुर्लक्षित घटकांच्या लढ्यांना बाबासाहेबांच्या विचारांतून दिशा मिळत आहे.
भारतातील लोकशाही संदर्भातील विविध आकडेवारी मांडून उपस्थितांचे लक्ष वेधले. बिश्नू परिहार यांनी महिलाविषयक चळवळीतील बाबासाहेबांचे महत्व अधोरेखित केले. कॅप्टन विनय बांबोळे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जयंतीचे महत्त्व व बाबासाहेबांचे शिक्षणविषयक विचार विशद केले.
दादासाहेब तांदळे यांनी एसएसडी इंटरनेशनल या संस्थेची स्थापनेविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात विद्यार्थी व अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास कांबळे व प्राजक्ता कदम यांनी विशेष कलासाहित्य तयार केले. एयर इंडियाच्या २० हुन अधिक कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली.
या कार्यक्रमाच्या यशासाठी कोलंबिया विद्यापीठातील आंबेडकरी विद्यार्थ्याने प्रचंड मेहनत घेतली या मधे आना सरदार, मैत्रिय, योगिता कांबळे, पलाश गजभिये, डेव्हिड, गेगे, करिश्मा मकेश्वर, प्रणाली बनसोड, आशुतोष, विघ्नेश, नयन मेश्राम, श्रद्धा मेश्राम, बिपिन खाडे, पूनम खाडे, महेंद्र जाधव आदी आयोजक मंडळात राहून कार्यकर्म यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विकास तातड यांनी कार्यक्रम यश्यस्वी करण्याकरता विद्यापीठातील प्राध्यापक अनुपमा राव, डाइवर्सिटी डीन जेनी, लेहमन लाइब्रेरी डायरेक्टर काकोब व लायब्रेरीयन गॅरी हॉर्समन यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले, तसेच जगातील विविध देशांतून, संयुक्त राष्ट्र संघातून आलेल्या सर्व उपस्थिताने आभार मानले व दर वर्षी या पेक्षा मोठा कार्यकर्म करण्याचा विश्वास व्यक्त केला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
