


एच. ए. कंपनी मधील आग वाऱ्याच्या झोतामुळे

लोहमार्गाच्या ठिणगीमुळे पसरली आग
पिंपरी, ता. २७: पिंपरीतील हिंदुस्तान एंटिबायोटिक्स (एचए) कंपनीत लागलेल्या आगीचे वृत्त (दिनांक 27 मार्च, 2025) काही दैनिकामध्ये प्रसिध्द झाले. परंतु सदरची आग ही एचए कंपनी लगत असलेल्या लोहमार्गाशेजारील वाळलेल्या जंगली गवताला लागली होती. त्या गवताची ठिणगी वाऱ्याच्या झोताने एचए कंपनीच्या परीसरात पडली व परिसरातील वाळलेल्या गवताने पेट घेतला.
तद्वंतर कंपनीतील कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांनी योग्य ती दक्षता घेत आगीवर दुपारी 12.30 ते 2.30 च्या दरम्यान नियंत्रण आणले यापूर्वी कंपनी कर्मचा-यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण यशस्वीपणे देण्यात आले असल्याने आग आटोक्यात आली.
परंतु हवेच्या झोतामुळे बाहेरील व लोहमार्गालगतच्या ठिणग्या पुन्हा कंपनीच्या परिसरात उडाल्या व साधारण 3.15 च्या सुमारास आग पुन्हा पसरली त्या नंतर अग्निशामक विभाग पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांना तत्काल पाचारण करण्यात आले व उर्वरित आग त्यांच्या मदतीने विझविण्यात आली.
सदर आगीमध्ये फक्त वाळलेले गवत व झुडपे जळालेली आहेत. यामध्ये कोणतीही वित्त व जिवित हानी झालेली नाही.
वेळोवेळी एचए कंपनीच्या प्रशासनाने आवारातील वाळलेले गवत व झुडपे सवच्छ भारत अभियानांतर्गत छाटलेले असून सातत्याने परीसर सवच्छ करण्यात येत आहे.
अशी माहिती एचए कंपनी प्रशासनाच्या वतीने दिली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
