


सौ. सीमा सावळे, माजी स्थायी समिती सभापती

स्त्री म्हणजे एक खडतर वाट…..
अशक्य ते शक्य करून दाखवणारी
अन्यायाला न्याय मिळवून देणारी
जी बदलेल समाजाची वहिवाट…
असाच संघर्षमयी सीमा सावळे यांचा प्रवास थोडक्यात…
सीमा सावळे यांचा राजकीय प्रवास हा संघर्षातून घडलेला आहे. स्पष्टवक्तेपणा आणि तात्काळ निर्णय घेण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्या लवकरच राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण करू लागल्या.
१९९५ च्या निवडणुकीत गजानन बाबर यांच्या प्रचारासाठी काम करत असताना त्यांना राजकारणातील बारकावे शिकता आले. जनतेशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याची संधी मिळाली. तिथूनच त्यांच्या राजकीय घोडदौडीला सुरुवात झाली. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरण्याचा त्यांचा स्वभाव आणि कार्यतत्परता यामुळे त्या लवकरच ओळखल्या जाऊ लागल्या.
जनतेच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष
सीमा सावळे या केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्या जनतेच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष करत राहिल्या. महिलांच्या सशक्तीकरणासाठी, गरीब-वंचित घटकांसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला.
आजही त्या आपल्या सडेतोड बोलण्याच्या शैलीने आणि ताबडतोब अॅक्शन घेण्याच्या कार्यशैलीने जनतेमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महिलांना राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा, अन्यायाविरुद्ध लढावे आणि आपल्या हक्कांसाठी ठाम उभे राहावे, असा त्यांचा संदेश आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️