


सलग दोन वेळा नगरसेविका; आंदोलनाचं शस्त्र वापरून उठवला होता आवाज

माजी नगरसेविका आशा धायगुडे शेंडगे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सलग दोन वेळा कासारवाडी प्रभागात नेतृत्व करण्याची संधी आशा ताईना मिळाली. नगरसेवक आणि त्यातूनच महिला असल्यामुळे महिलांच्या प्रश्नांवर लक्ष त्यांनी वेधले. कामाचा आवाका आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी संधीचे सोने केले.
शाळा-विद्यालयामध्ये फक्त मुलींसाठी कराटे प्रशिक्षण घ्यावेत यासाठी त्यांनी मा. आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला. तसेच, महिला बाल कल्याण विभागाकडून तो विषय मंजूर करून त्यांनी घेतला. व अमलबजावणी केली. याच बरोबर प्रभागातील महिला करिता वर्षातून दोन वेळेस लाठी-काठीचे प्रशिक्षण राबविले जाते. तलवार बाजी शिकवली जाते. त्यातून महिलांना धाडसी बनविण्याचे त्या काम करीत आहेत.

म्हत्वाची बाब म्हणजे, प्रभागात असलेल्या सर्व शाळांमध्ये गुड टच बॅड टचचे धडे देण्यासाठी वैयक्तिक स्तरावर सामाजिक संस्थांच्या मार्फत तो कार्यक्रम राबविला जातो. त्याच बरोबर महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण झाले पाहिजे, आर्थिक उन्नती झाली पाहिजे त्यासाठी पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रभागातील महिलांना कसे सहभागी होता येईल आणि त्यांचा व्यवसाय कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे काम त्यांनी केले.

महिलांना पोहता आले पाहिजे यासाठी स्व खर्चाने मे महिन्यात त्यांच्या वतीने बॅच घेतली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांना गाद्या शिवणचे प्रशिक्षण झाल्यानंतर शाब्बासकी देण्यासाठी बँकेने १० लाख रुपायाचे कर्ज त्यांना देऊ केले. त्यामुळे बचत गटातील अनेक महिलांना स्वयं रोजगार निर्माण करण्याची संधी आशा ताईना उपलब्ध करून देता आली. त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

महिलांच्या अनेक विषयावर सातत्याने माझे काम सुरू असते. यापुढच्या काळातही मी जाहीर आव्हान करत आहेत की, ज्या ज्या महिलांना कधीही महिला म्हणून माझी मदत लागली तर त्यांच्या अडचणी मध्ये, त्यांच्या उन्नती मध्ये त्यांच्या बरोबर त्यांची मैत्रीण सदैव पाठीशी उभी राहण्यास तत्पर असेल,अशा विश्वास देते.
-आशा शेंडगे धायगुडे

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️