


आयुक्त व अ क्षेत्रीय अधिकारी पिंपरी चिंचवड यांना निवेदन

पिंपरी, ता. १७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना निगडी प्राधिकरण या भागातील सर्व सेक्टर मध्ये रस्त्याची अनेक कारणांमुळे खोदाई केली जात आहे. त्यामुळे, निगडी प्राधिकरण मधील रस्ते खड्डे मुक्त करण्याची मागणी मनसे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष बाळा दानवले यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अमृत योजनेअंतर्गत 24 तास पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे, महानगर गॅस वाहिन्या, स्मार्ट सिटी ची कामे, MECB केबल साठी, आणि विविध कंपन्यांच्या केबल डक साठी, निगडी प्राधिकरण मध्ये गेल्या अनेक वर्षापासून अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरती सातत्याने खोदकाम सुरू असते.
खोदकाम केल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजवले जात नाहीत. रस्त्याचे खोदकाम तसेच इतर कामांमुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून रस्त्याची अगदी चाळण झाली आहे.
प्रामुख्याने निगडी प्राधिकरणाच्या सर्व सेक्टरमध्ये अंतर्गत रस्त्यांवरही हजारो वाहने, बस रिक्षा पादचारी जात असल्याने लोकांचे हाल होऊ लागले आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे निगडी प्राधिकरण मधील नागरिक हैराण झाले आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे रस्ते अधिकच खराब झाले त्याचबरोबर काही ठिकाणी रस्त्यांवर माती खडी राडारोडा साचला आहे या सर्वांचा परिणाम म्हणून वातावरणातील धुळीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे तसेच खड्ड्यांमुळे या भागांमध्ये अनेक लहान-मोठे अपघातही झालेले असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यताही निर्माण झालेली आहे.
रस्ता धोकदायक बनल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, वाहन चालक व निगडी प्राधिकरण येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
येथे आहे धोकादायक रस्ता
प्रामुख्याने निगडी प्राधिकरण मधील सेक्टर 27 अ गड परिसरातील अंतर्गत रस्ते सेक्टर 26 दुर्गेश्वर मार्ग ते परमार पार्क रस्त्यापर्यंत व तसेच सर्व सेक्टर 24,25 एल आय जी मधील,26,27,28 निगडीतील दुर्गा मंदिर, साई मंदिर, परिसरातील अंतर्गत सर्व रस्ते डांबरीकरण करण्यात यावे. निगडी प्राधिकरण मधील सर्व सेक्टर मधील अंतर्गत रस्ते अनेक वर्षांपासून केलेले नाहीत.
खोदकाम झाल्यानंतर फक्त तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम केले जात आहे, त्यामुळे संपूर्ण रस्ते पावसाळा झाल्यामुळे अजूनही खराब झालेले आहेत निगडी प्राधिकरण मधील सर्व अंतर्गत रस्ते संपूर्ण डांबरीकरण करावं ही विनंती रस्त्यांविषयी आम्ही अनेक वेळा क्षेत्रीय कार्यालयांना पत्र दिलेले असून निधी उपलब्ध नाही अशा प्रकारचे आम्हाला उत्तर देण्यात येत आहे.
येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये यावरती आपण काळजीपूर्वक निर्णय घेऊन रस्ते दुरुस्त करावे तसे आम्हाला लेखी पत्र द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात आंदोलन करून लवकरच उपोषण केले जाईल याची नोंद घ्यावी. या वेळी मयूर चिंचवडे विधानसभा अध्यक्ष, भागवत नागपुरे उपविभाग अध्यक्ष, उपस्थित होते.
बाळा दानवले, उपाध्यक्ष मनसे पिंपरी चिंचवड शहर

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
