


पिंपरी, ता. ३ – सावित्रीमाई फुले जयंतीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महात्मा फुले सभागृहाच्या परिसरामध्ये ज्ञानज्योती सावित्रीमाई यांच्या अर्धाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकास संभाजी गायकवाड व नगरसेविका अनुराधा ताई गोरके यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अनुराधा ताई गोरके, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, निगडी विभाग अध्यक्ष बापूसाहेब डंबरे, आदी प्रमुख प्रमुख पदाधिकारी बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
