


पिंपरी, ता. ३ : जोग सेंटर पुणे येथे एमआयडीसीचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी पाटिल यांनी आज शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा औद्यागिक संघटना मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते.

मिटिंगला प्रादेशिक अधिकरी RO1, सचिन बारावकर तसेच अर्चना पठारे प्रादेशिक अधिकारी RO2, तसेच विभागीय कार्यकारी अभियंता विविध संघटनाचे पदाधिकारी अनुक्रमे पिंपरी-चिंचवड इंडस्ट्रिज फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद पानसरे, चाकण इंडस्टिजचे दिलीप बटवाल, लघु उद्योग संघटनेचे संदिप बेलसरे, श्री राणे, इंडस्ट्रिज फोरम चे अभय भोर तसेच हिंजवडी इंडस्ट्रिज असोशिसनचे संतोष भुढे, इन्फोर्सेस, कॅप जेमिनी वगैरे सॉफ्टवेअर कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.
इंडस्ट्रिज फेडरेशने खालील मुद्दे उपस्थित केले :
पिंपरी चिंचवड च्या आजुबाजुच्या परीसरातील पी एम आर डी ए, पिं. चिं. मनपा, एम आय डी सी, मिलिट्री कॅम्प कमांडर वगैरे शासकीय संस्थांच्या समन्वयाच्या अभावामुळे मुलभुत सेवा सुविंधांचा (उदा. रस्ते, सांडपाणी प्रकल्प, स्ट्रिट लाईट, वाढलेली अतिक्रमणे) वगैरेंच्या समस्या वर्षानुवर्षे सुटलेल्या नाहीत.
रेड झोन च्या समस्येमळे तळवडे परीसरातील उद्योजकांना फार मोठ्या सम्स्यांना बांधकाम परवाने, बँकेची कर्जे, तसेच विविध नाहारकत दाखले मिळणे अशक्यप्राय झालेले आहेत. एम आय डी सी च्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन करून मिळणारा उर्वरीत भुखंड लघु उद्योजकांना वाटप करण्यात यावा, मेट्रोचे विस्तारीकरण करून औद्योगिक परीसरातील दळणवळण सुलभ करावे वगैरे मागण्या अधिका-यांकडे करण्यात आले.
वेळोवेळी दर महिन्याला वरीष्ठ अधिका-यांकडुन मिटिंग घेऊन या समस्यांचे जलद गतीने निराकरण केले जाईल व लघु उद्योगांना सर्व प्रकारचे सहाय्य एम आय डी सी पालकतत्व स्विकारून निश्चितपणे करेल असी खात्री शिवाजी पाटिल यांनी दिली. प्रास्ताविक गोविंद पानसरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन अभय भोर यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
