


पुणे, ता. २१ : एमपीसीने घेतलेल्या या परीक्षेत मोनिका ही sebc संवर्गातून राज्यात पहिली आणि एकूण मुलींमधून राज्यात चौथी येण्याचा हा बहुमान पटकावला .

मोनिका ही मूळची दौंडच्या पडवी गावची. शेतकरी कुटुंबातील .वडील शेतकरी .तसे पाहिले तर पडवी गाव दुष्काळ पट्टीत येणारे पण तरी देखील उत्तम शेती करत दोन्ही मुलांना जीवनात आनंद फुलवु पाहणाऱ्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कसलीही हयगय केली नाही.मोनिकाच्या बुद्धिमत्तेवर कुटुंबीयांचा प्रचंड विश्वास. मुलगी शिकली तर येणाऱ्या सर्व पिढ्यांचा उद्धार होतो या जाणिवेतून त्यांनी मोनिकाला पाठबळ दिले.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावाकडे झाल्यानंतर महाविद्यालय शिक्षण मोनिकाने फलटण येथे घेतले.आणि पुढे तिने पुणे येथील कृषी महाविद्यालयातून 2019 मध्ये कृषिची पदवी घेतली.आणि स्वतःला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात झोकून दिले.प्रथम मोनिकाने कृषी क्षेत्रातील परीक्षा दिल्या पण मुलाखत देऊनही अगदी कमी गुणांनी तिची पोस्ट राहिली.पुन्हा जोमाने सुरवात करत तिने राज्यसेवा परीक्षा दिली.
त्यातही पूर्व मुख्य मुलाखत असे तिने दोन वेळा mpsc प्रवास केला.पण तेथेही यशाने तिला थोड्या थोड्या गुणांनी हुलकावणी दिली .पण अपयशाने खचून जाईल ती मोनिका कसली. तू कर वही जो तू चाहता है लेकिन होगा वही जो मै चाहती हु अस तिने नशिबाला सांगितले होते.आणि आज तिच्या या यशापुढे नशीबही झुकले आणि तिने हे यशाचे पहिले पाऊल टाकले आहे.
निश्चित एक एक पाऊल टाकत ती यशाच्या मार्गाने अंतिम ध्येयपूर्तीकडे झेपावणार आहे यात तिळमात्र शंका नाही.मोनिका 2021 मध्ये ट्रिक्स अभ्यासिकेत आली आज 3 वर्ष होत आली तिला या ट्रिक्स परिवारात.तिच्या या यशाने ट्रिक्सची शान आणि मान वृंधिंगात झाला.नक्कीच तिच्या या यशात तिच्या कठीण परिश्रमाचा मोठा वाटा आहे.सुरेश भटांच्या विझले आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही.
रोहिदास बिंनवडे, ट्रिक्स अभ्यासिका, संस्थापक

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
