


पिंपरी, ता. २१ : पिंपरी चिंचवड शहराला आणि मावळ तालुक्याला वरदान असलेली पवना नदीची शुद्धता आणि स्वच्छचा टिकावी यासाठी गेल्या २० वर्षापासून पवना माईचा उत्सव साजरा करण्यात येतो. जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

यामध्ये पवनानगर परिसरातील गावे,प्राथमिक-माध्यमिक शाळा सहभागी होत असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ज्ञानप्रबोधिनी निगडी, ग्रामप्रबोधिनी साळुंब्रे,संकल्प इंग्लिश स्कूल, वारू kothurne माध्यमिक विद्यालय,पवना विद्या मंदिर, सरुबाई दळवी ज्युनिअर कॉलेज, पिंपरी चिंचवड भागातील महाविद्यालय तसेच अनेक सेवाभावी संस्था यांनी या उत्सवात सहभाग घेतला होता.

पवना धरण या ठिकाणी जलपूजन करून दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पवना नदीवरील ब्राह्मनोली घाटावर दिंडी चे परिसरातील शाळांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पवनामाईची आरती करून स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. नदीचे पूजन करण्यात आले. पवना नदीची कृतज्ञता म्हणुन नदीत कणकेचे दिवे सोडण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जलदिंडी प्रतिष्ठानचे बाबासाहेब काळे यांनी विद्यार्थ्यांना पवना नदीचा उगम, नदीचा आवाका, नदीची अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यातील दरी कमी होण्यात नागरिक म्हणून आपली भूमिका याबाबत सखोल माहिती दिली. सध्या पाण्याचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असून यात नदी पूनर्जिवणासाठी व संवृढणासाठी जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यात शाळा , विद्यार्थि व ग्रामस्थ यानी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले.
पवनामाई महोत्सवाचे प्रमुख व्यंकटेश भताने यांनी नदी संवर्धनामध्ये लोकसहभाग व विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी शाळा व शासनाची भूमिका कशी असली पाहिजे यावर भाष्य केले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील एस एन बी पी शाळा, जेएसपीएमएस कॉलेज, डी आय सी स्कूल, मॉडर्न हायस्कूल, ए सी एस कॉलेज, सिटी प्राईड स्कूल चे विद्यार्थी सहभागी होते.
याप्रसंगी ओंका गौरीधर यांनी रिव्हर पोलिस ही संकल्पना मांडून त्यावर विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत माहिती दिली. याप्रसंगी सूर्यकांत मुथीयान, पानसे काका, नितीन भोगले, विश्वस्त अजित नीचीत, आयर्न मॅन अभिजित लोंढे, डॉ. माळी सर, संतोष ललवाणी लोहगड बोट क्लबचे अनिल राजीवडे या मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️