


चिंचवड, ता. २० : चिंचवड मधील बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालय¸ शरदनगर विद्यालयात कारपेंटर डे साजरा करण्यात आला.

यावेळी पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड व फेविकॉल चॅम्पियन क्लब पिंपरी चिंचवड चे सर्व सदस्य यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने विद्यालयात विद्यार्थ्यांना लागणारे फर्निचर,,, बेंच,, टेबल, व कपाट या साहित्यांची दुरुस्ती केली. तसेच बक्षीस वितरण करण्यासाठी एक, दोन, तीन क्रमांकाचे डेक्स छान बनवले आणि इतर फर्निचर साहित्याची डाग- दुजी अतिशय उत्साहामध्ये करून दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड, सचिव लहू कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे हे उपस्थित होते.
शाळेसाठी दिलेल्या विनामूल्य सेवेबद्दल संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड, सचिव लहू कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे यांनी आलेल्या सर्व पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड व फेविकॉल चॅम्पियन क्लब सदस्यांचे आभार मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
