


पिंपरी, ता. २० : श्री बालाजी सोसायटीच्या बालाजी विधी महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयात दि. 20/12/2024 रोजी भेटीचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्यात BALLB V आणि LLB III च्या अंतिम वर्षाच्या 43 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. दौरा यशस्वी झाला.

विद्यार्थ्यांना युक्तिवाद ऐकण्याची, संग्रहालय आणि न्यायाधीशांच्या ग्रंथालयाला भेट देण्याची संधी मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत डॉ. तेजस्वी आव्हाड, सहाय्यक प्रा.अजय पाटील आणि समन्वयक सिल्व्हिया मास्कारेन्हास उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी भविष्यात थोडेसे डोकावण्याची ही संधी होती. महाविद्यालयाने आयोजित केलेला हा यशस्वी अभ्यास दौरा होता.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
