


चिंचवड, ता. १२ : चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे होणाऱ्या १३व्या राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलनाचे. आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्या हस्ते होणार उदघाटन होणार आहे.

सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन मराठी खगोल अभ्यासक मंडळ, नांदेड आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४-१५ डिसेंबर २०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण, चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
१४ डिसेंबर, शनिवार रोजी सकाळी १०:०० वाजता या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मान. आयुक्त. शेखर सिंह यांच्या शुभहस्ते होणार आहे.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक प्रवीण तुपे, मराठी खगोल अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष. दा. कृ. सोमण, पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक. सारंग ओक तसेच विलो मॅथर अँड प्लॅटचे चेअरमन. हेमंत वाटवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ०६:३० वाजता ज्येष्ठ खगोल अभ्यासक श्री दा. कृ. सोमण यांचे ‘छंद खगोलशास्त्राचा’ या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान सर्व खगोलप्रेमी नागरिकांसाठी खुले असणार आहे.पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
