


मुंबई दि.12 – परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही व सकल मातंग समाज खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/ अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी केली आहे.

परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने निषेध करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या मागचा सुत्रधार शोधण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे आपण करणार असल्याची माहिती शिवशाही व्यापारी संघ संस्थापक /अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिली आहे.
परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती काढुन झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने तीव्र आंदोलन केले.रास्ता रोको केला,रेल रोको केला.संविधानाचा अवमान करणे हा अत्यंत गंभीर आणि राष्ट्रद्रोही गुन्हा आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार आहे.या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे.आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत.निषेध आंदोलनातुन त्या भावना व्यक्त झालेल्या आहेत.त्यामुळे आता आंबेडकरी जनतेने या प्रकरणी संयम बाळगुन शांतता राखण्याचे आवाहन लोकसेवक युवराज दाखले यांनी केले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
