


ॲड. थोपटे यांचा तब्बल दहा वेळा पत्रव्यवहार; दुय्यम निबंधकावर कारवाई शून्य

भोसरी, ता. १२ : दुय्यम निबंधकाचे काम सरकारला महसूल गोळा करून देण्याचे आहे. जागेच्या मालकीबाबत खात्री करण्यास त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत. मात्र दुय्यम निबंधक नको त्या कागदपत्रांची मागणी करतात तसेच सदर मिळकतींचे मालकी हक्क तपासत बेकायदेशीरपणे दस्त नोंदविण्यास नाकारत आहेत. पंरतु पैसे दिल्यानंतर असे दस्त नोंदविले जात आहेत. यामध्ये नागरिकांची करोडो रूपयांची लुट केली जात आहे. याबाबत ॲड. थोपटे यांनी नोंदणी महानिरीक्षक यांच्याशी दहा वेळा पत्रव्यवहार करूनही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल देऊन आयजीआर महाराष्ट्र यांनी १२ जुलै २०२१ रोजी काढलेले परिपत्रक बेकादेशीर घोषित केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे दस्त नाकारायचे नाहीत, प्रत्येक दस्त स्वीकारून रेडी रेकनरप्रमाणे योग्य स्टॅम्प स्वीकारून व त्या दस्ताची नोंदणीबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो दस्त संबंधित पक्षकाराला देण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे.
या आदेशाविराधात आयजीआर सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. यावर कोणत्याही प्रकारचा अदयाप स्टे नाही. सदर प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे असे सांगून सह दुय्यम निबंधक दस्त नोंदणीस नकार देत आहेत. मात्र दुय्यम निबंधक ज्यादा पैशाची मागणी करत असून ते दिल्यानंतर असे दस्त नोंदवित आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालयात मोकळ्या भूखंडाचे तसेच बांधकामाचे दस्त नोंदणी करावयाची असल्यास दुय्यम निबंधक कॅलक्युलेटरवर आकडे दाखवून नागरिकांकडून फार मोठ्या प्रमाणात गुपचूप पैसे घेतात.दुय्यम निबंधकांना जागेची मालकी हक्क तपासण्याचा कोणताही कायदेशिर अधिकार नाही, याबाबत मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. त्यात म्हटले आहे की, दस्त नोंदवणे हे दुय्यम निबंधकाला जमिनीच्या मालकी हक्काबाबत चौकशी करण्याचा अधिकार नाही.
याबाबत योग्य ती कारवाई दुय्यम निबंधक अधिकाऱ्यावर होणे अपेक्षित आहे तसेच दुय्यम निबंधकांनी नागरिकांची केलेली लूट शासनाने वसूल करून नागरीकांना परत करावी.
पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व सह दुय्यम निंबधक (वर्ग-२) करत असलेल्या भ्रष्टाचाराची स्वतंत्र समीती नेमुन त्वरीत चौकशी करणेत यावी तसेच जे सब रजिस्ट्रार विनाकारण दस्त नोंदणीस नकार देतात त्यांची त्वरीत चौकशी करून त्याबाबत योग्य ती कायदेशिर कारवाई संबंधित सह दुय्यम निंबधका विरूध्द करावी.
– अॅड. बाळासाहेब तान्हाजी थोपटे

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
