


चिखली, ता. १२: चिखली श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय ९ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राष्ट्रिय खेळाडू डॉ. भारती देवकर शर्मा (अस्थीरोग तज्ञ सिंबॉयसिस मेडिकल कॉलेज) यांच्या हस्ते झाले. खेळातून आनंद मिळवायचा व देशासाठी कार्य करण्याचा संदेश त्यांनी दिला.


विद्यार्थ्यांनी क्रीडाज्योत, क्रीडाध्वज, संचलन तसेच जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके, स्वागत गीत, खेळाडूंना खिलाडूवृत्तीने खेळण्याची शपथ असा भरगच्च उद्घाटन सोहळा पार पडला. साघिक स्पर्धांमध्ये कबड्डी मुले-मुली, कनिष्ठ-वरिष्ठ गटामध्ये तसेच जलतरण, स्केटिंग, बुद्धिबळ, स्लो सायकलिंग, रेस वॉकिंग या स्पर्धांचे आयोजन केले आहे. परिसरातील १५ शाळा तील ६१४ खेळाडू सह्भागी झाले आहेत. सौरभ माटे, प्रतिक चव्हाण, रुषी ठोकळ, तुषार माने यांनी पंच म्हणून काम पाहिले.
१) राजश्री शाहू महाराज शाळा, शरद नगर२) राजा शिवछत्रपती माध्य. विद्यालय, तळवडे३) राजा शिवछत्रपती प्राथ. विद्यालय, तळवडे४) सिद्धिविनायक पब्लिक स्कुल५) प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मिडिअम स्कुल, चिखली६) अभंग इंग्लिश मेडिअम स्कुल,देहू७) ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल शाळा,चिखली८) न्यु एंजल्स इंग्लिश स्कुल, गणेश नगर, तळवडे९) सरस्वती विद्यालय,तळवडे१०) आण्णासाहेब चौबे हायस्कुल, तळेगाव११) गुरुवर्य अकॅडमी स्कुल, गणेश नगर, चिखली१२) श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित प्राथ. विद्यालय,चिखली१३) श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित माध्य. विद्यालय,चिखली१४) डि.वाय. पाटील ज्ञानशांती विद्यालय,निगडी१५) विद्या निकेतन शाळा
या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी ज्योती कोरटकर, उन्मेश कुळकर्णी, आकाश माळी,ईश्वरी नेवाळे, आत्माराम बोराडे, सोनाली सकुंडे, सुचिता सरोळकर, नुतन पाटील, मेघा कुलकर्णी, रोशनी इंगळे, शितल गुंजाळ, निर्मला साळवे, संध्या सातपुते, मनिषा बोराडे, संगिता खडकेकर, संगिता गावडे, सुभाष खडकेकर, प्रिती पैठणकर, माधुरी इंगळे, उज्ज्वला पटाईत तसेच पंढरीनाथ निकुम, रमेशबोदडे , गीता दांदळे,संगीता माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तेजस प्रज्ञा यशवंत यांनी केले. तर समारोप मुख्याध्यापक गौतम इंगळे यांनी केला. कार्यक्रमास माध्यमिक च्या मुख्याध्यापिका वैशाली नरवडे यांनी व वीरेद्र सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साधना खुळे यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️