


श्री.दत्त जयंती निमित्त दि.८ ते १५ डिसेंबर 2024 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम

भोसरी, ता. ७ – श्री दत्त जयंती उत्सव सार्वजनिक सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजन रविवारी दि. ८ ते १५ डिसेंबर रोजी श्री. दत्तमंदिर, प्रियदर्शनी शाळेसमोर उत्कर्ष कॉलनी, राजवाडा इंद्रायणीनगर, भोसरी येथे करण्यात आले आहे.
श्री दत्तजन्म मुख्य सोहळा शनिवारी १४/१२/२०२४ रोजी, सकाळी ४ ते ६ काकडा आरती व अभिषेक, १० ते १२ ग्रंथदिंडी सोहळा व दुपारी १२ ते २ होम हवन, ४ ते ६.३० कीर्तन संपन्न होणार आहे. मिती मार्गशीर्ष शु.७ रविवार दि. ०८/१२/२०२४ पासून ते मार्गशिर्ष पौर्णिमा वार रविवार दि. १४/१२/२०२४ अखेर संपत्र होत आहे.
परमार्थप्रेमी भाविकांना कळविण्यात आनंद वाटतो की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानमय व सात्विक विचारांच्या सानिध्यात श्री संत तुकाराम महाराजांच्या वेदमय विचारांनी पावन झालेल्या भूमित इंद्रायणीनगरमध्ये ध्येयपूर्तीच्या दिशेने सतत वाटचाल करीत व सांस्कृतिक वारसा जोपासत २९ व्या वर्षीं श्री दत्त जयंती उत्सव साजरा करीत आहोत. ह.भ.प.श्री. मारुती महाराज तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे. तरी या निमीत्ताने सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत. तरी आपलाच कार्यक्रम समजून तन, मन, धनाने उपस्थित राहुन सहकार्य करावे.कार्यक्रम रूपरेषा पुढीलप्रमाणे –
*दैनंदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे*
सकाळी ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते १२ श्री गुरुचरित्र पारायण , दु. १२ ते १.३० महिला भजन, दुपारी १.३० ते ३ महिला भजन, ३ ते ५ नियमाचे भजन, सायं ०५ ते ६ हरिपाठ , वेळ रात्री ८ ते १०, रात्री १० नंतर हरिजागर* किर्तनकार, वेळ व तारीख – कीर्तनाची वेळ (रात्री ८ ते १०)महिला भजन (दु.१२ ते १.३०), महिला भजन (३.१.३० ते ३)
१. रविवार ०८/१२/२०२४ – ह.भ.प. बाळासाहेब महाराज काकडे
२. सोमवार ०९/१२/२०२४ दत्तात्रेय महाराज माशेरे
३. मंगळवार १०/१२/२०२४ गोरख महाराज जाधव
४. बुधवार ११/१२/२०२४ ह.भ.प. वैभव महाराज झेंडे
५. गुरुवार १२/१२/२०२४ धनंजय महाराज रौधळ
६. शुक्रवार 13/12/२०२४ पोपट महाराज राक्षे
७. शनिवार १४/१२/२०२४ सागर महाराज गोरडे
८. रविवारी १५/१२/२०२४ रोजी श्री गणेश महाराज फरताळे यांचे काल्याचे कीर्तन सकाळीं ९.३० ते १२
श्री गुरुचरित्र पारायण सोहळा ह.भ.प. श्री. सुदाम महाराज मुसळे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. तसेच, महाप्रसाद रविवार दि. १५/१२/२०२४ रोजी दु. १२ ते ३ व सायं. ७ ते ९ वा. पर्यंत या वेळेत होणार आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️