


पिंपरी, ता. ७: रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने मागील 04 वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन अभियान उपक्रम राबवला जातो. यावर्षी देखील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भिमसृष्टी स्मारक येथे एक वही एक पेन अभियान राबवण्यात आले.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना व्यक्तीपूजा मान्य नव्हती त्यांनी कायम विचार व शिक्षणाला महत्व दिले.त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श घेत दिनांक 06 डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने त्यांचे प्रबोधन केले जाते व बाबासाहेबांना हार,फुले अर्पण करण्यापेक्षा आपण त्याच ऐवजी एक वही व एक पेन दान करून गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी बाबासाहेबांना अपेक्षित अभिवादन करावे असे आवाहन केले जाते.आणि या आवाहनाला मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी प्रतिसाद देतात.यावर्षी देखील या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने राबवलेल्या अभियानाला चिंचवड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा.शंकर जगताप,विधानपरिषदेचे आमदार मा.अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा.तुषार कामठे,भाजप पक्षाचे शहर कार्याध्यक्ष मा. शत्रुघ्न काटे,माजी नगरसेवक अनुराधा गोरखे,माजी नगरसेविका निकिता कदम,मा. संजय मंगोडेकर,लेखक नामदेवराव जाधव,गायक संकल्प गोळे,पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष मा.ऍड.गौरव वाळुंज,सचिव ऍड.उमेश खंदारे व सर्व कार्यकारणी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.कुंभार साहेब अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व अनुयायांनी उपस्थित राहून या अभियानात सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या….
यावेळी संस्थेचे प्रदेश महासचिव यांच्या वतीने सांगण्यात आले की जमा झालेले साहित्य हे हे गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्यांनी www.rayatvvm.in या संस्थेच्या वेबसाईट वर अथवा 9604683459 या नंबरवर संपर्क साधावा त्यांना साहित्य मोफत दिले जाईल.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,राज्य समन्वयक श्वेता साळवे,राज्य सहसचिव प्रगती कोपरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मयूर जगताप,अभिजित लगाडे,अजय चक्रनारायन,योगेश कांबळे,भाग्यश्री आखाडे,सागर गायकवाड या पदाधिकारी यांनी या अभियानासाठी दिवसभर परिश्रम घेतले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️