Skip to content
11/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • सांगवीकरांच ठरलंय; चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगतापच !
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

सांगवीकरांच ठरलंय; चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगतापच !

suwarna gaware 08/11/2024
IMG-20241108-WA0014
Spread the love

प्रचंड उत्साह, विश्वास, जोश आणि सांगवी करांच्या आशीर्वाद व प्रेमाने भारावून गेले शंकर जगताप !

– नवी सांगवीतील मतदार शंकर जगताप यांच्या पाठीशी- आमचं मत चिंचवडच्या विकासालाच.. म्हणजेच शंकर जगतापांनाच !’

चिंचवड : प्रतिनिधी, 7 नोव्हेंबर 2024 – नवी सांगवीमध्ये आज (गुरुवारी) झालेल्या भव्य प्रचार रॅलीदरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी परिवारजनांशी संवाद साधला, आणि त्यांचे विजयासाठी आशीर्वाद घेतले.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील बंधू – भगिनी आणि सर्व सामान्य जनता ही कायम माझ्या हृदयात आहे. आणि त्यांचे स्थान कायम तसेच राहील. त्यांच्या या विश्वासामुळेच लढण्याची ताकत मला मिळाली आहे. त्यांनी प्रेमाने आणि उत्साहाने माझे स्वागत केले. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात माय – बाप जनतेच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून मी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे जगताप यांनी या वेळी सांगितले.

सकाळच्या सत्रात नवी सांगवी येथे निघालेल्या प्रचार रॅलीत एम के चौक, समता नगर, गणेश नगर, कीर्ती नगर, समर्थ नगर, आदर्श नगर मधील चैत्रबन सोसायटी, सरस्वती पार्क या ठिकाणी नागरिकांशी भेटी गाठी घेत मतदारांशी घराघरात जाऊन संवाद साधला.

माता- भगिनींकडून त्यांना औक्षण केले जात होते.या प्रचार रॅलीमध्ये माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, बळीराम जाधव, सांगवी – राहटणी मंडल उपाध्यक्ष कविता निखाडे, शीतल आगरखेड, सूर्यकांत गोफणे, बाबुराव शितोळे, सखाराम रेडेकर, अशोक कवडे, प्रशांत कडलक, बाळासाहेब पिल्लेवार, सुरेश तावरे, राजू पाटील, आप्पा पाटील, शामराव पालांडे, संदीप दरेकर, राजू मोरे, सुनील कोकाटे, गणेश बनकर, देविदास शेलार, उमेश झरेकर, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, शिवशरण टेंगळे, बसवराज हिरेमठ, जयसिंग जाधव, अभय नरवडेकर, अमित घोडसाद, चंद्रकांत बेंडे, संजय मराठे, साई कोंढरे, लालासाहेब ढोरे, शिरीष कवडे, राजू नागणे, ज्ञानेश्वर खैरे, सचिन खराडे, विशाल खैरे, संभाजी भेगडे, गिरीश देवकाते, विक्रम भेगडे, मनीष भापकर, राजेश साळुंखे, पवन साळुंखे, प्रवीण जाधव, अविनाश खुंटे, प्रवीण पाटील, योगेश कदम, ललित म्हसेकर, शैलेश जाधव, मनीष रेडेकर, विकी रेडेकर, विशाल गायकवाड, संतोष पाटील, रामदास पोखरकर, रवींद्र रासने, रविकुमार चौधरी, प्रवीण देवासे, संभाजी ढवळे, श्रीकांत पवार, शंकर ननावरे, गोविंद मुखणे, अमित कानडे, बोरसे सर, योगेश कदम यांच्यासह नवी सांगवीतील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्ग, युवा वर्ग भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उमेदवार जगताप म्हणाले की, माझ्या याच परिवारामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल. स्व. लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रेरणेने चिंचवड विधानसभेतून जास्तीत जास्त मतांनी विजय मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि विकासपुरुष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साथ देवून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आपल्याला आणायचे आहे, असे उमेदवार जगताप म्हणाले.

————————————–

गेल्या 10 वर्षांत स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठा हातभार लावला होता. शहरातील पाण्याचा प्रश्न. जीवघेण्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा. शहरातील गावांना ‘स्मार्ट सिटी’ बनवलं.

आमदार फंडातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध भागात विकासात्मक कामे केली. तसेच अडीअडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. विविध आरोग्य शिबिरे घेतली. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडास्पर्धा आयोजित केल्या.

ज्येष्ठ नागरिक कामे केली. आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन केले. विविध धार्मिक सण, उत्सव आयोजित करून सामाजिक एकोपा जपला. त्यांनी जनहितासाठी अनेक विकास कामे केली. तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटवला. या आणि अशा अनेक कामांमुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्व. लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकप्रिय ठरले होते.

  • शंकर जगताप,उमेवार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 65
Tags: #चिंचवड #शंकर जगताप Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारणार
Next: कार्यकर्ते झाले भावूक : आमदार महेश लांडगे तुम्ही मन जिंकलं!-

Related Stories

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 1

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 2

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 3

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026
नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात 1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25 4

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

05/06/2026
पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 5

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026
1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25
  • Cultural
  • Poilitical

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

suwarna gaware 05/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते
  • नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.