


पिंपरी चिंचवड, ता. १९: भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चॅलेंजर्स पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे व श्री. संदीप विठ्ठल काटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
“ड्रीम इंडिया – विकसित भारत” या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून आणि वक्तृत्वातून भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने, कल्पना व विचार अत्यंत कल्पकतेने मांडले.
मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, प्राचार्या सौ. ज्योतिका मलकानी मॅडम, शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला.
✨ सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भारताच्या स्वप्नांना प्रोत्साहन! 🇮🇳

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
