


पिंपरी चिंचवड, ता. २०: गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा श्री. संजय वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या उपक्रमाचे आयोजन चेअरमन श्री. संदीप काटे आणि व्हाईस चेअरपर्सन सौ. अनिता ताई काटे यांच्या सहकार्याने करण्यात आले.
प्राचार्या सौ. ज्योतिका मलकानी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून स्वतःच्या हातांनी सुंदर पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती साकारल्या.
या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, परंपरा, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धन यांचे महत्त्व समजले. पर्यावरणाची काळजी घेत आनंददायी आणि जबाबदार पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 🌱✨
💚 “बाप्पा घडवूया प्रेमाने, पर्यावरण जपूया मनापासून!” 💚
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
