Skip to content
29/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • शेतकऱ्यांनाही लाडक्या बहिणींप्रमाणेच अपात्र करण्याचा सरकारचा डाव ? – काशिनाथ नखाते
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

शेतकऱ्यांनाही लाडक्या बहिणींप्रमाणेच अपात्र करण्याचा सरकारचा डाव ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 29/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
Spread the love

पिंपरी-चिंचवड, दि.२९ : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्याऐवजी विविध अटी-शर्तींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अपात्र ठरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे. ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेत तब्बल ८१ लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले, त्याच धर्तीवर आता शेतकऱ्यांनाही कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रतर्फे आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचा तसेच कर्जमुक्तीसाठी आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक लाला राठोड, विजय कदम, अनिल पवार,सरला रोठे,सोनाली सांगळे,रश्मी कदम,ज्योती मुंजे, मनिषा बुंदे,जयश्री गालग,उषा काकडे,आशा शिंदे,राधाबाई काशीद आदीसह कष्टकरी कामगार उपस्थित होते.

कसम ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नखाते यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ६६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण १७ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीला जाहीर झालेल्या पहिल्या यादीत केवळ ५५३ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आल्याने योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नखाते यांनी म्हटले आहे की, पोर्टलवर नाव आलेल्या १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ३ लाख ३३ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने हजारो शेतकरी संभ्रमात आहेत. ई-केवायसीसाठी घालण्यात आलेल्या नियम व अटी अत्यंत जाचक असल्यामुळे अनेक शेतकरी प्रक्रियेतून बाहेर पडण्याची शक्यता असून, त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

नखाते यांनी पुढे सांगितले की, अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात काहींना ₹१.३० लाख, काहींना ₹८० हजार, तर काहींना त्यापेक्षाही कमी रक्कम मंजूर होत असल्याचे अनुभव मराठवाडा विदर्भ येथे समोर येत आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल न करता जाहीर केल्याप्रमाणे सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू करावी आणि ई-केवायसीसह इतर अटी सुलभ करून सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 2
Tags: #cultural #काशीनाथ नखाते Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

शेतकऱ्यांनाही लाडक्या बहिणींप्रमाणेच अपात्र करण्याचा सरकारचा डाव ? – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 1

शेतकऱ्यांनाही लाडक्या बहिणींप्रमाणेच अपात्र करण्याचा सरकारचा डाव ? – काशिनाथ नखाते

29/07/2026
दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 2

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 3

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 4

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 5

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

शेतकऱ्यांनाही लाडक्या बहिणींप्रमाणेच अपात्र करण्याचा सरकारचा डाव ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 29/07/2026
a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • शेतकऱ्यांनाही लाडक्या बहिणींप्रमाणेच अपात्र करण्याचा सरकारचा डाव ? – काशिनाथ नखाते
  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.