Skip to content
08/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’

suwarna gaware 03/04/2026
199b87dc-3e36-4fc6-8d76-90f338e53590
Spread the love
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक
  • महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी, ता.३:पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन भामा आसखेड पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी जानेवारी-२०२७ चा ‘अल्टिमेटम’ महापालिका प्रशासनाला दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्धारित वेळेत प्रकल्पाचे लोकार्पण होईल, अशी माहिती भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांनी आंद्रा, भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सत्तारुढ पक्षनेता प्रशांत शितोळे, मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दीपक पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आणि आगामी कामांची तातडीने गती मिळविण्यासाठी उपाययोजना निश्चित केल्या आहेत.

या योजेतील भामा आसखेड जलउपसा केंद्रावर काम प्रगतीवर आहे. जॅकवेल – १००% पूर्ण झाले आहे. पंप हाऊस – ७५%, सबस्टेशन – ८०%, अप्रोच ब्रिज –५% आणि विद्युत, यांत्रिकी, Instrumentation, SCADA साहित्य – १००% उपलब्ध झाले आहेत.


रावेत आणि निघोजे बंधारा प्रदूषणावर उपायोजना करा…
शहराला पाणी उपसा करणाऱ्या दोन्ही बंधाऱ्यातील पाणी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत आपण विधानसभा सभागृहातही मंत्रीमहोदय यांचे लक्ष वेधले आहे. पुरवठा होणारे पाणी प्रदूषित असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची पाणी प्रक्रिया यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

सेकंडरी ट्रिटमेंटनंतर आता टर्शरी ट्रिटमेंट करावी लागणार आहे. त्याठिकाणी ड्रेनेजचा वास येतो. त्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा. तसेच, निगडी ऑग्युमेंन्टेशन टप्पा दोनचे काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. निगडी WTP – ४२८ MLD (१०० MLD वाढ, एकूण ५२८ MLD) कामाला गती द्यावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली.


ठेकेदार बदला किंवा नवीन घ्या, पण काम वेळेतच झाले पाहिजे..!
भामा आसखेड धरण येथील अशुद्ध जलउपसा केंद्र पासून नवलाख उंबरे येथील बी.पी.टी पर्यंत १७०० मि.मी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाचा ठेकेदार – मे. ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांनी दिलेल्या मुदतीमध्ये काम केलेले नाही. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सदर ठेकेदाराचे काम रद्द केले आहे.

नवीन निविदा काढणे किंवा न काढणे हा प्रशासनाचा अधिकार आहे. पण, या प्रकल्पाचे काम निश्चित वेळेत झाले पाहिजे. त्यासाठी संबंधित ठेकेदार याला जाचक अटी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नमूद करा. भामा आसखेड प्रकल्पातून सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत ट्रायल चालू झाली पाहिजे. पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालू करुन जानेवारी २०२७ मध्ये मुख्यमंत्री महोदय यांच्याहस्ते लोकार्पण झाले पाहिजे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली.


“पिंपरी-चिंचवडच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील अनुभवी अधिकारी आणि महापालिका अस्थापनेवर असणारा अधिकारी भूसंपादन व विविध परवानग्यांसाठी पूर्णवेळ नियुक्त केला पाहिजे. तशी सूचना प्रशासनाला केली आहे. आंद्रा-भामा आसखेड पाणी योजना पिंपरी-चिंचवडसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जानेवारी- २०२७ मध्ये कोणत्याही परिस्थितीत पूर्ण क्षमतेने योजना सुरू होईल. या करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत आहोत.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 24
Tags: #Bhamaaskhed #water #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली
Next: महावितरण आकुर्डी कार्यालयाचा भोंगळ कारभार! सहा दिवस ग्राहक अंधारात !!

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.