


पिंपरी चिंचवड, ता. ६: आकुर्डी महावितरण स्थानिक कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून,सहा दिवस ग्राहकाला अंधारात ठेऊन विक्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा नारळ देऊन कंपनीने सत्कार करावा अशी मागणी संतप्त ग्राहकाने केली आहे.

आकुर्डीतील केएसबी चौकात पूनम सेल्स कॉर्पोरेशन या नावाने व्यवसाय असून,गेली सहा दिवस त्यांचा विद्युत पुरवठा खंडित आहे. त्याची दखल अनेक तक्रारी करूनही घेतली जात नसल्याने,ग्राहकाने अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे तसेच नुकसान भरपाई म्हणून सहा दिवसांसाठी साठ हजार रुपये अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून द्यावेत अशी मागणी त्याने अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्याकडे केली आहे.
विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आणि कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा ग्राहकाने दिला असून,महावितरणच्या भोंगळ कारभाराची चर्चा होत आहे. महावितरण कडे माणसे,साहित्य याची वणवा असून,कुठलीही कामे नियमात होत नाहीत.
ऑनलाइन नावात बदलाचे अर्ज टेबलखालून पैसे दिले नसल्यास रिजेक्ट केले जात आहेत.याबाबत पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ने देखील आकुर्डी उपविभागाच्या भोंगळ कारभाराची तक्रार केली असून,कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
