


पिंपरी, दि. ३: पताशी बाई रतन चंद मानव कल्याण ट्रस्ट संचालित पांजरपोळ मोशी येथील अंध मुलांच्या शाळेत सुनीता हुंबरे यांच्या आयोजनातून एक भावस्पर्शी गाण्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली

या कार्यक्रमात हरीश शरणागत, कावेरी देशमुख, रेखा मेसरे, नितीन रणदिवे, राजेंद्र पगारे, मीना जगदाळे, मीरा अभंग,चंद्रकांत हिवरकर, नंदकुमार कांबळे,हेमलता मोरे, उत्तम जाधव तसेच बालगायिका वृंदा जाधव यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
वंदना संदीप यादव, अक्षदा यादव, मोहिनी जाधव, सानिका कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
“पापा कहते है बडा नाम करेगा” या नितीन रणदिवे यांनी गायलेल्या प्रसिद्ध गाण्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी ठेका धरला. निलय शाह यांनी विशेष रंगत आणली. आयोजिका सुनीता हुंबरे यांच्या हस्ते शाळेतील मुख्याध्यापिका राजश्री चौधरी यांचा सत्कार करण्यात आला..
“क्यू चलती है पवन”, “रिमझिम गिरे सावन”, “तेरी चुनरिया दिल ले गई”, “इतनी शक्ति हमें देना दाता”, “चोरीचा मामला मामा ही थांबला”, “अश्विनी येना”, “देखा ना हाय रे, सोचा ना”, “मैं ऐसा क्यू हूं” यांसारखी विविध गाणी यावेळी सादर करण्यात आली.
दृष्टीहीन विद्यार्थी हरी ओम वलेवार यांनी “हे दुःख भंजन” तर हरिश्चंद्र वणी यांनी “मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा” हे गीत सादर करून उपस्थितांना भावुक केले. दृष्टी नसली तरी त्यांच्या स्मरणशक्ती व कलेतील प्रावीण्याने सर्वांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे निवेदन नंदकुमार कांबळे यांनी केले. गरूड सर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमासाठी राजश्री चौधरी (मुख्याध्यापिका) आणि त्यांचा शिक्षक वर्ग यांचे सहकार्य मिळाले. ध्वनी व्यवस्था व व्हिडिओची जबाबदारी महेश लायगुडे यांनी पार पाडली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
