Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

suwarna gaware 25/03/2026
9ed9c29f-af19-4112-b581-3d743a8686d6
Spread the love
  • सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रश्न सुटला
  • महापालिका प्रशासनाकडून वर्ग खोल्या केल्या उपलब्ध

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी, ता. २५: मोशी येथे शिवाजीवाडी- डुडुळगाव परिसरातील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वर्गखोल्यांचा प्रश्न अखेर सुटला असून, तब्बल ४७० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हक्काच्या वर्गखोल्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, ही समाविष्ट गावांतील पहिली ‘सीबीएसई’ आणि इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.

या शाळेसाठी २०१७ पासून महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, २०२० ते २०२३ या कालावधीत वर्गखोल्यांच्या अभावामुळे एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देता आला नव्हता. सध्या सुमारे १२५० विद्यार्थी वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे प्रवेशापासून वंचित होते. ज्या ठिकाणी एका वर्गात ४० मुले आणि ४० मुली असा प्रवेश दिला जातो, त्या ठिकाणी वर्गखोल्या नसल्यामुळे केवळ २०-२० विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावा लागत होता.

या गंभीर समस्येकडे भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत महापालिका भूमि जिंदगी विभागाकडून शाळेसाठी आवश्यक वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या शिक्षण विभागाला हस्तांतरित केल्या आहेत. महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी एका शैक्षणिक संकूलाचे काम सुरू आहे. त्यामधील एका भागात ही शाळा सुरू होईल. त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

मोशीतील श्री नागेश्वर मंदिराजवळ असलेल्या या शाळेत सीनियर केजी ते इयत्ता नववीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. नवीन वर्गखोल्या उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळाल्या असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे मोशी परिसरातील शिक्षण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळण्यास मदत होणार आहे.



“गेल्या काही वर्षांपासून वर्गखोल्यांच्या अभावामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. प्रवेश मिळूनही योग्य सुविधा नसल्याने सतत चिंता वाटत होती. आता महापालिका प्रशासनाने वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्या मुलांना सुरक्षित आणि योग्य वातावरणात शिक्षण घेता येणार आहे. यामुळे पालक म्हणून आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.”

  • रामेश्वर गालट, पालक.

“मोशी परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हीच आमची प्राथमिकता आहे. सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमधील वर्गखोल्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पुढील काळातही परिसरातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 26
Tags: #cultural #education #आमदार महेश लांडगे #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: पिंपरी-चिंचवडकरांची “मुद्रांक शुल्का”च्या कामासाठी  ‘पुणेवारी’ थांबणार!- आमदार शंकर जगताप
Next: पुनावळे परिसरात धूळ-प्रदूषण प्रश्न गंभीर, अर्थसंकल्पात पाण्यासोबत प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पुरेसा निधी आणि योग्य उपाययोजना करण्याची राहुल कलाटे यांची मागणी

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.