Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी-चिंचवडकरांची “मुद्रांक शुल्का”च्या कामासाठी  ‘पुणेवारी’ थांबणार!- आमदार शंकर जगताप
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी-चिंचवडकरांची “मुद्रांक शुल्का”च्या कामासाठी  ‘पुणेवारी’ थांबणार!- आमदार शंकर जगताप

suwarna gaware 25/03/2026
beed9e33-e072-4b6d-bb5a-ba26e565ec8f
Spread the love

स्वतंत्र मुद्रांक कार्यालयासाठी आमदार जगताप यांचा पुढाकार; महसूलमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

शहराचा वाढता विस्तार आणि मालमत्ता व्यवहारांच्या मोठ्या संख्येमुळे स्वतंत्र मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाची गरज

पिंपरी, 25 मार्च (प्रतिनिधी ) : पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार आणि मालमत्ता व्यवहारांची मोठी संख्या लक्षात घेता, शहरासाठी स्वतंत्र ‘सह जिल्हा निबंधक, वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी’ कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून  लेखी निवेदन दिले असून, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे दस्त नोंदणीनंतरच्या विविध कामांसाठी नागरिकांची पुण्यात होणारी पायपीट थांबणार आहे.

आमदार जगताप याबाबत म्हणाले, पिंपरी-चिंचवड हे आशिया खंडातील झपाट्याने विकसित होणारे औद्योगिक आणि निवासी शहर आहे. शहरातून दरवर्षी मुद्रांक शुल्काच्या स्वरूपात सरकारला मोठा महसूल मिळतो. मात्र, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वरिष्ठ स्तरावरील कामांसाठी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आजही पुणे येथील मुद्रांक शुल्क विभागाच्या मुख्य कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

पुणेवारीतून सुटका होणार

सध्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, थेरगाव, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, आकुर्डी आणि रावेत यांसारख्या प्रमुख निवासी व आयटी क्षेत्रातील नागरिकांना दस्त नोंदणीनंतरच्या  मुद्रांक शुल्क परतावा, दस्त दुरुस्ती, अपील दाखल करणे यांसारख्या कामांसाठी पुण्यात जावे लागते. हवेली तालुक्यातील अनेक दुय्यम निबंधक कार्यालये पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत असली, तरी त्यांचे नियंत्रण पुणे शहरातून होते. यामुळे प्रशासकीय प्रक्रियेत विलंब होतो. पिंपरी चिंचवडसाठी शहराचा वाढता विस्तार आणि मालमत्ता व्यवहारांच्या  मोठ्या संख्येमुळे स्वतंत्र मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाची गरज असून हे मंजूर झाल्यास दस्त नोंदणीनंतरच्या विविध कामांसाठी नागरिकांची पुण्यात होणारी पायपीट थांबणार आहे.


‘गुड गव्हर्नन्स’ संकल्पनेला बळ

“महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या अनेक क्रांतिकारक निर्णयांमुळे राज्यातील महसूल विभागात मोठी पारदर्शकता आली असून, याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील सामान्य जनतेला झाला आहे. प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा आणून लोकांचा वेळ वाचवणाऱ्या अनेक धोरणांमुळे खऱ्या अर्थाने सुशासनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवडसाठी देखील स्वतंत्र सह जिल्हा निबंधक पद आणि कार्यालय त्वरित मंजूर करणे गरजेचे झाले आहे.” पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र कार्यालय झाल्यास स्थानिक स्तरावर नागरिकांना दस्त नोंदणीची जलद सेवा मिळेल. राज्य सरकारच्या ‘गुड गव्हर्नन्स’  संकल्पनेला यामुळे बळकटी मिळेल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे. 
……….

पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय होणे ही काळाची गरज आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून लेखी निवेदन दिले असून, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे दस्त नोंदणीनंतरच्या विविध कामांसाठी नागरिकांची पुण्यात होणारी पायपीट थांबणार आहे. या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’ संकल्पनेला बळकटी मिळेल. महायुती सरकार सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून, या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो.”

—  शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड

…………..

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 32
Tags: #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: देहूरोड ते सुतारवाडी ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ वर विधानसभेत शिक्कामोर्तब  – आमदार शंकर जगताप
Next: मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.