


पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी, ता. १२: पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ताथवडे, पुनावळे व वाकड परिसर अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पार्टी व आर.पी.आय. (आठवले गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल दादा तानाजी कलाटे, कुणाल वैजनाथ वाव्हळकर, श्रुती राम वाकडकर व रेश्मा चेतन भुजबळ यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होऊ घातलेल्या पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित कोपरा सभेत, राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड यांनी आपल्या भाषणात सांगितले की,प्रभाग क्रमांक २५ मध्ये मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव वास्तव्यास असून, रोजगार व उदरनिर्वाहासाठी विविध भागांतून येऊन येथे स्थायिक झालेल्या कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे.निवडून आल्या नंतर महानगरपालिका स्तरावर बंजारा समाजासह सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी व मूलभूत प्रश्न सोडवण्या साठी हे लोकप्रतिनिधी सकारात्मक व सहकार्याची भूमिका घेतील,असा परिषदेचा ठाम विश्वास आहे.
समाजहित,सर्वांगीण विकास,सामाजिक समता व दर्जेदार नागरी सुविधा या उद्दिष्टांच्या पूर्तते साठी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने या चारही उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे.तसेच भाजपा व आर.पी.आय.(आठवले गट) यांनी दिलेल्या प्रभाग क्रमांक २५ मधील उमेदवारांच्या नावा समोरील कमळ या निवडणूक चिन्हा समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रेमकिसन राठोड यांनी समाज बांधवांना केले.
या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड,राज्य संघटक रावसाहेब चव्हाण,तालुका प्रमुख आकाश दामाजी राठोड,देवाभाऊ चव्हाण,नवनाथ राठोड,रवी भाऊ राठोड,अविनाश राठोड,रंजीत पवार,कैलास चव्हाण, वसंत राठोड,बाबू चव्हाण,विलास पवार,कल्पनाताई जाधव,उरुळी जाधव,स्मिताताई चव्हाण,अनिताताई राठोड यांच्यासह राष्ट्रीय बंजारा परिषदेचे शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
