


: श्रुती वाकडकर यांच्या प्रचाराला वेग

पिंपरी, ता. ११ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) मध्ये भाजपचे उमेदवार श्रुती राम वाकडकर, राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर व रेश्मा भुजबळ यांच्या प्रचारासाठी भाजपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत चर्चा केली. या भेटीत परिसरातील नागरी समस्या, विकासकामे आणि आगामी काळातील नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.

राम वाकडकर यांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा आणि स्वच्छता या विषयांवर नागरिकांनी मते मांडली. “केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर कायम नागरिकांसोबत उभे राहणारे नेतृत्व म्हणजेच श्रुती वाकडकर,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत नागरिकांनीही “प्रभाग २५ चा सर्वांगीण विकास हेच आमचे प्राधान्य आहे,” अशी भूमिका मांडली. प्रभाग क्रमांक २५ मध्ये श्रुती वाकडकर यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक आणि विकासात्मक काम नागरिकांच्या स्मरणात आहे.
सर्वसामान्यांच्या अडचणी ऐकून त्यावर पाठपुरावा करणे, प्रशासनाशी समन्वय साधून कामे मार्गी लावणे आणि महिलांसह युवकांना सोबत घेऊन पुढे जाणे, हीच त्यांची ओळख बनली आहे. एकूणच, प्रभाग क्रमांक २५ मध्ये झालेल्या या नागरिक संवादातून श्रुती वाकडकर यांच्यासह भाजपच्या पॅनलला मिळणारा वाढता पाठिंबा आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
यावेळी नागरिकांना आवाहन करताना राम वाकडकर म्हणाले, “विकास, पारदर्शकता आणि सुरक्षित भविष्यासाठी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून श्रुती राम वाकडकर, राहुल कलाटे, रेश्मा भुजबळ, कुणाल वाव्हळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.”
प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे.
कमळाला मतदान म्हणजे स्थिर आणि सक्षम विकास वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसराला आधुनिक सुविधा, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि संवेदनशील नेतृत्व देण्यासाठी श्रुती वाकडकर, राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर व रेश्मा भुजबळ ह्या भाजपाच्या अधिकृत पॅनलला बहुमताने निवडून द्या.
- राम वाकडकर
शहर वरिष्ठ उपाध्यक्ष भाजपा

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
