


पिंपरी, दि. ८: देहूरोड, किवळे विकासनगर येथील एम.बी. कॅम्पसह आसपासच्या परिसरात शुक्रवारी (ता. ९) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराला मोठा वेग मिळाला. पिंपरी-चिंचवड शहरभर ‘घड्याळा’चे वारे वाहत असून, प्रचारादरम्यान नागरिकांकडून उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून, घराघरांतून बाहेर येत नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे मनापासून आणि उत्साहात स्वागत केले.

या प्रचारफेरीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र. १६ चे पॅनल प्रमुख सर्वसाधारण गट ‘ड’चे उमेदवार माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ‘ब’ गटाच्या उमेदवार जयश्री भोंडवे, सर्वसाधारण महिला ‘क’ गटाच्या आशा भोंडवे, तसेच अनुसूचित जाती ‘अ’ गटाच्या श्रेया तरस–गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यांच्या सोबत पोलीस पाटील दिवाणजी भोंडवे, अक्षय तरस, तानाजी भोंडवे, कुणाल भोंडवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी संदीप गोजगे, संदीप भोंडवे, नवनाथ भोंडवे, निखिल भोंडवे, माऊली भोंडवे, प्रमोद भोंडवे, अक्षय भोंडवे, स्वप्नील भोंडवे, बबन फडके, राजेंद्र म्हस्के, रमेश शिंदे, मनोहर भोंडवे, भानुदास भोंडवे, बाबाजी भोंडवे, अतुल भोंडवे, तसेच सनी हापसे, अमोल तरस, लखन तरस, शुभम तरस, चेतन शितोळे, सागर निकाळजे, किरण हापसे, रॉनी फिलिप्स, शंकर पुजारी, कामेश तरस, सुशांत साळुंखे, ओंकार तरस आदी कार्यकर्ते प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले होते.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिक, सोसायटी पदाधिकारी व कुटुंबीयांशी थेट संवाद साधला. प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांबाबत नागरिकांनी आपली मते व अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती देत, पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण आराखडा नागरिकांसमोर मांडला.
लोकांच्या विश्वासावर आणि विकासाच्या कामावरच निवडणूक लढवत आहोत. प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण हेच आमचे ध्येय आहे, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
एकूणच देहूरोड व किवळे परिसरात राष्ट्रवादीच्या प्रचारामुळे वातावरण पूर्णपणे राष्ट्रवादीमय झाले असून, प्रभाग क्र. १६ मध्ये नागरिकांचा ठाम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रभाग क्र. १६ मधील माझ्या माय-बाप जनतेने दाखवलेले प्रेम, विश्वास आणि आपुलकी मला आयुष्यभर ऊर्जा देणारी आहे. मी या प्रभागाला कुटुंब मानून काम केले आणि आज मिळणारा पाठिंबा म्हणजे त्या प्रामाणिक कामाची पावती आहे. हा विश्वास कधीही तुटू देणार नाही. प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवणे, हाच माझा ठाम संकल्प आहे.
मोरेश्वर भोंडवे,पॅनल प्रमुख

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
