Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • मोरेश्वर भोंडवे यांना पुढे आमदारकी द्यायची आहे; अजित पवार
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

मोरेश्वर भोंडवे यांना पुढे आमदारकी द्यायची आहे; अजित पवार

suwarna gaware 07/01/2026
5f00794d-6188-4b1a-9996-d0d86dd90ec0
Spread the love


वाल्हेकरवाडीतील ‘विजय संकल्प’ सभेत उपमुख्यमंत्र्यांचे गौरोद्गार


पिंपरी, ता. ७ : ‘प्रभाग क्रमांक १६ मधून आधी मोरेश्वरला नगरसेवक करा, त्यानंतर त्याला आमदारकी द्यायची आहे. हे सर्व माझे जीवाभावाचे सहकारी आहेत,’ असे ठाम व गौरवास्पद विधान उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी मंगळवारी (ता. ६) वाल्हेकरवाडी येथे आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत केले. त्यांच्या या वक्तव्याने सभास्थळी जल्लोष उसळला.

या वेळी अक्षय तरस, तानाजी भोंडवे, दिवाणजी भोंडवे, कुणाल भोंडवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने श्रेया तरस–गायकवाड या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. अशा नव्या चेहऱ्यांना प्रशिक्षण देऊन कामाची संधी देणे, नागरिकांचे प्रश्न कसे सोडवायचे याकडे लक्ष देणे, हे आमचे धोरण आहे.


जयश्री भोंडवे यांच्या निवडणूक चिन्हाबाबत अडचण निर्माण झाली होती; मात्र न्यायालयाने त्यांना न्याय दिला. आम्ही जे करतो ते खोटं नाही, खरंच करतो,असा टोला त्यांनी लगावला. तानाजी भोंडवे यांनी अनेक वर्षे केलेल्या कामामुळे आशा भोंडवे यांना संधी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


आता कारभारी बदलायची वेळ आली आहे, असे सांगत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. श्रीमंत महानगरपालिका कर्जबाजारी होत चालली असून नसबंदी आणि प्रधानमंत्री आवास योजनेत मोठे घोटाळे झाले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आमचे उमेदवार घड्याळ’ चिन्ह घेऊन घराघरांत जात आहेत.आमची सत्ता आल्यानंतर कायदा-सुव्यवस्था सक्षम ठेवली जाईल, कोयता गँगसारख्या प्रवृत्तींना पायबंद घातला जाईल, असेही ते म्हणाले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्रमांक एक बनवायचे असतील तर नियमित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी यावर ठोस उपाय हवेत. अनधिकृत बांधकामे, विद्युत वाहिन्यांचे अडथळे, पार्किंग समस्या यावर निर्णय घ्यावे लागतील. टेंडर रिंगमधून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत भ्रष्टाचाराच्या बकासुराला हद्दपार करायचे आहे, असेही पवार म्हणाले.


संगणकानंतर आता एआयचे युग आहे. या क्रांतीत शहराला पुढे न्यायचे आहे. हिंजवडी आयटी पार्क आम्ही आणला; पिंपरी-चिंचवडमध्ये बदल घडवून दाखवले. मात्र गेल्या सात-आठ वर्षांत शहराचे नुकसान झाले. त्यामुळे सत्ताबदल अपरिहार्य आहे,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रभाग १६ मधील पॅनल प्रमुख व सर्वसाधारण गट ‘ड’चे उमेदवार माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ‘ब’ गटाच्या उमेदवार जयश्री भोंडवे, सार्वत्रिक महिला ‘क’ गटाच्या आशा भोंडवे आणि अनुसूचित जाती ‘अ’ गटाच्या श्रेया तरस–गायकवाड यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 36
Tags: #ajit pawar #Moreshwarbhondve #Ncp #rashtrwadi #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: चेतन बेंद्रे व समीर जावळकर यांची भाजपा मधून हकालपट्टी
Next: पिंपरी गाव प्रभाग क्र.२१ मध्ये आज भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘जाहीर सभा’; आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.