


• लठ्ठपणा केवळ वजनवाढ नाही, तर संपूर्ण शरीरावर परिणामकरणारा बहुप्रणाली आजार असल्यावर भर

• देशभरातील २५० पेक्षा अधिक चिकित्सक, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी
पुणे, २२ डिसेंबर २०२५ : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथे “ओबेसिटी अपडेट २०२५: बियॉंड द स्केल” ही राज्यस्तरीय परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. या परिषदेत विविध राज्यांतील चिकित्सक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थी एकत्र आले असून लठ्ठपणा (ओबेसिटी) हा एक बहुप्रणाली (मल्टिसिस्टम) आजार म्हणून सर्वंकष दृष्टीकोनातून अभ्यास करण्यात आला. या परिषदेमधील वैज्ञानिक तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा, पॅनेल चर्चा तसेच संशोधन सादरीकरणांचा समावेश होता.
या परिषदेदरम्यान डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांच्या प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्री पी पाटील म्हणाल्या, “लठ्ठपणा (ओबेसिटी) हा केवळ वजनवाढीपुरता मर्यादित नसून तो संपूर्णशरीरावर परिणाम करणारा गुंतागुंतीचा बहुप्रणाली आजार आहे. त्यामुळेत्यावरील उपचारांसाठी सर्वंकष व शास्त्रीय पुराव्यांवर आधारित दृष्टिकोनआवश्यक आहे.
‘ओबेसिटी अपडेट २०२५: बियॉंड द स्केल’’ यांसारख्यापरिषदांमुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये आवश्यक ती जाणीवनिर्माण होते. तसेच विविध वैद्यकीय शाखांमधील समन्वय वाढूनसंशोधनाधारित उपचारपद्धतींचा प्रसार होतो, ज्याचा थेट लाभ रुग्णांच्याउपचार गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी होतो. वैद्यकीय शिक्षणात गुणवत्तावृद्धिंगत करणे, नवे उपक्रम राबविणे आणि सार्वजनिक आरोग्याबाबतसमाजात जागरूकता निर्माण करणे, यासाठी आमची संस्था सातत्यानेप्रयत्नशील आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चेविश्वस्त व खजिनदार मा. डॉ. यशराज पी पाटील यांनी सांगितले, सदरपरिषद वैद्यकीय ज्ञानाचा प्रसार होण्यासह सध्याच्या आरोग्य क्षेत्रातीलआव्हानांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झालेआहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सहभागामुळे शैक्षणिक संवाद समृद्धझाला असून, अशा उपक्रमांमधून रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्यासमदत होणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथील शैक्षणिक संचालिका डॉ. पी. वत्सलास्वामी यांनी सांगितले, लठ्ठपणा या आजाराकडे आजच्या डॉक्टरांनी केवळ एका शाखेतून नपाहता विविध वैद्यकीय तज्ज्ञांच्या संयुक्त दृष्टीकोनातून पाहणे गरजेचेआहे.या परिषदेमुळे डॉक्टरांना नव्या उपचार पद्धती व अद्ययावत माहितीमिळण्याची योग्य संधी मिळाली. यामुळे रुग्णांच्या आखणी अधिकचांगल्या पद्धतीने उपचार करता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथील शैक्षणिक सहकार्य संचालक व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. ए. एल. काकराणी यांनी सांगितले, झपाट्याने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि डॉक्टरांनी अद्ययावत राहणे गरजेचे आहे. अशा परिषदांमुळे त्यांना नव्या घडामोडी समजून घेण्याची संधी मिळते. यामुळे अध्यापन आणि रुग्णांवरील उपचार अधिक प्रभावी होतात. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये नवे शिकण्याची ओढ आणि नव्या कल्पनांची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
डॉ. मनसी हरले, आयोजन सचिव, मेडिसिन विभाग, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांनीसांगितले, “आमचा उद्देश केवळ वजनवाढ म्हणून नव्हे, तर लठ्ठपणामुळेहा संपूर्ण शरीरावर परिणाम होणाऱ्या गुंतागुंतीचा आजार म्हणून समोरआणणे होता.
या परिषदेसाठी देशभरातून २५० पेक्षाहुन अधिकप्रतिनिधींनी सहभाग घेतला, ज्यामुळे प्रत्येक सत्र अधिक माहितीपूर्णआणि समृद्ध झाले. तसेच ३० पेक्षा जास्त पोस्टर व पेपर सादरीकरणांमुळेकार्यक्रमास अधिक मूल्य मिळाले.”
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथील आयोजनाध्यक्ष व मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम विखेयांनी नमूद केले कि “या परिषदेचे यश म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्येलठ्ठपणाच्या महत्त्वाबाबत वाढत चाललेली जाणीव. तज्ज्ञांनी मांडलेलेअनुभव आणि मार्गदर्शन चिकित्सकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.”
या परिषदेत लठ्ठपणाचा बहुअवयवी आजार म्हणून अभ्यास, निदानपद्धती, ग्लुकागॉन लाइक पेप्टाइड १ (GLP-१) आधारित उपचार, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, कार्डिओमेटाबोलिक संबंध तसेच नव्याअँटी-ओबेसिटी औषधांवर सत्रे आयोजित करण्यात आली होती.
बॉडीकॉम्पोझिशन अॅनालिसिसवरील प्रात्यक्षिक कार्यशाळा आणि स्थूलतेतीलगुंतागुंतांवरील पॅनेल चर्चा विशेष आकर्षण ठरल्या. कार्यक्रमाचा समारोपवक्ते, सहभागी आणि आयोजन समितीच्या अभिनंदनाने करण्यात आला.
‘ओबेसिटी अपडेट २०२५’ ही परिषद एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमठरली असून वैद्यकीय शिक्षणातील उत्कृष्टता आणि दीर्घकालीनआजारांच्या सर्वंकष व्यवस्थापनासाठी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकलकॉलेजची बांधिलकी अधिक दृढ झाली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
