Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड शहरात कुठे ; किती मतदार : सुमारे १८ लाख मतदार
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड शहरात कुठे ; किती मतदार : सुमारे १८ लाख मतदार

suwarna gaware 15/12/2025
97ac6d76-d7b8-4f43-abe8-77cd3a96f32d
Spread the love

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला होणार मतदान

पिंपरी, १५ डिसेंबर २०२५ : राज्य निवडणूक आयोगकडून महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आला असून पारंपरिक (ऑफलाईन) स्वरूपात नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून उमेदवारी माघारीसाठी २ जानेवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक राबवली जाणार असून चार सदस्यीय प्रभागरचना असणार आहे. एकूण ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठीची निवडणूक आहे. प्रत्येक उमेदवारासाठी १३ लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला ४ मते देण्याचा अधिकार असणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात एकूण मतदारांची संख्या सुमारे १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९ लाख ५ हजार ७२८ तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ७ हजार ९६६ इतकी आहे. तर इतर मतदारांची संख्या १९७ इतकी आहे. निवडणुकीसाठी २ हजार ४४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ करिता ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे. प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ करिता क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, एमआयडीसी, भोसरी येथे तर प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ करिता ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणे येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे. प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ करिता कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी येथे तर प्रभाग क्रमांक १, ११, १२ व १३ करिता सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाउन हॉल येथे व प्रभाग क्रमांक २१, २३, २४ व २७ साठी ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव येथे आणि प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ करिता पिंपरी चिंचवड बॅडमिंटन हॉल, पी.डब्ल्यू.डी. मैदान, सांगवी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापित करण्यात आले आहे.

महापालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. मतदान जनजागृती कार्यक्रम देखील महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला असून सर्व पात्र मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करावे, याकरिता जास्तीतजास्त प्रयत्न करण्यासाठी स्वीप मोहीम व्यापक करण्यात आली आहे.
……
नागरिकांना पाहण्यासाठी अंतिम मतदार यादी खालील ठिकाणी उपलब्ध आहे

महानगरपालिका मतदार यादी कक्ष : निवडणूक मतदार यादी कक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पहिला मजला, मुंबई–पुणे रस्ता, पिंपरी

अ क्षेत्रीय कार्यालय : भेळ चौक, निगडी प्राधिकरण, निगडी

ब क्षेत्रीय कार्यालय : पिंपरी चिंचवड लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव

क क्षेत्रीय कार्यालय : नेहरूनगर, पॉलिग्रास ग्राउंडजवळ, एमआयडीसी, भोसरी

ड क्षेत्रीय कार्यालय : औंध–रावेत रोड, रहाटणी

इ क्षेत्रीय कार्यालय : ग्रोथलॅब इमारत, पांजरपोळ समोर, पुणे–नाशिक रोड, भोसरी

फ क्षेत्रीय कार्यालय : नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी

ग क्षेत्रीय कार्यालय : तिसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मागे, थेरगाव

ह क्षेत्रीय कार्यालय : मुलींचे आय.टी.आय. प्रशिक्षण केंद्र, कासारवाडी
………………

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 29
Tags: #election #pimpri #चिंचवड #महापालिका निवडणूक Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: महापालिका निवडणूकांच बिगुल वाजल; १५ जानेवारीला मतदान
Next: निवडणुकीपूर्वीच भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’;भाजपच्या दणक्याने राष्ट्रवादीची रणनीती फेल!

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.