Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ जागृती अभियान
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ जागृती अभियान

suwarna gaware 15/12/2025
becf3a27-b104-458a-8be7-18f8a9521e4a
Spread the love
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ गौरव रथातून जनजागृती

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी, ता. १५: देव–देश–धर्म आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधणारे “विकासाभिमुख हिंदुत्व जागृती अभियान” हे अभियान पिंपरी-चिंचवडमध्ये राबवण्यात येत आहे. अभियानची सुरूवात भोसरी विधानसभा मतदारसंघात होणार असून, दि. 16 ते 25 डिसेंबरदरम्यान हा जागर होत आहे. सलग 10 दिवस चालणाऱ्या या अभियानात भोसरीतील 12 प्रभागांमध्ये विकासाभिमुख हिंदुत्वाचा संदेश घराघरांत पोहोचवला जाणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांची ही संकल्पना असून, या अभियानाचे मुख्य आकर्षण ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ गौरव रथ आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वागतासाठी हा रथ विविध प्रभागांतून प्रवास करणार आहे. हिंदुत्व, शौर्य आणि भारतीय संस्कृतीचा जागर घडवणारा हा सोहळा ऐतिहासिक ठरणार असून, विकास आणि हिंदुत्व यांची सांगड घालणारे देशातील पहिले अभियान म्हणून याकडे पाहिले जात आहे.

मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात उभारण्यात येत असलेले जगातील सर्वात उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शिल्प म्हणजेच “स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण” हे पिंपरी-चिंचवड शहराची नवी ओळख ठरत असून, शिव–शंभूप्रेमींसाठी ते एक प्रेरणास्थान आणि शक्तीस्थळ बनले आहे.

या अभियानामागील भूमिका स्पष्ट करताना, हिंदवी स्वराज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. देव–देश–धर्म आणि विकास या चारही घटकांचा समतोल साधल्यास विकसित राष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


अभियानाची उद्दिष्टे :
भाजपा सरकारच्या काळात झालेल्या मूलभूत विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे, सर्वसमावेशक हिंदुत्वाचा आत्मविश्वास निर्माण करणे, सर्व धर्मनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ घटकांना विकासाच्या समान व्यासपीठावर आणणे आणि पिंपरी-चिंचवडला “विकास + हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आदर्श शहर” म्हणून उभे करणे, अशी उद्दिष्टे या अभियानामागे आहेत.


संघटनात्मक बळावर जनजागृती :
आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पन्ना प्रमुख ते प्रभाग अध्यक्षांपर्यंतच्या संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून घराघरांत संपर्क साधण्यात येणार असून, नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. पक्षाची संघटनशक्ती अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, मतदार संघातील प्रत्येक गावातील ग्रामदैवताचे आशिर्वाद घेवून अभियान सुरू होईल. त्यानंतर पालक-विद्यार्थी संवाद, शाळांमध्ये सोयी-सुविधा पाहणी, प्रभागातील उच्चशिक्षीत तज्ञ-डॉक्टर-सीए यांच्याची ‘चाय पे चर्चा’, महिला बचतगट सदस्यांची चर्चा, दुपारी रथ यात्रा, रॅली, महाआरती आणि सांगता सभा असे सलग 10 दिवस 12 प्रभागांमध्ये अभियान राबवण्यात येत आहे.


विकासात्मक हिंदुत्व म्हणजे नेमकं काय?
विकासाभिमुख हिंदुत्व म्हणजे केवळ धार्मिक ओळख नव्हे, तर श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा, सामाजिक समरसता आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा समतोल साधणारी विचारधारा होय. पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांतून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात आहे.

1. वारकरी परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड : वारकरी संप्रदायातील श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा संकल्प आणि ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची स्वप्नपूर्ती — हेच विकासाभिमुख हिंदुत्व.

2. ग्रामसंस्कृतीचे जतन आणि शाश्वत विकास : ग्रामसंस्कृतीचे जतन, गावठाणांचे संवर्धन आणि समाविष्ट गावांचा नियोजित विकास म्हणजे विकासाभिमुख हिंदुत्व.

3. शिव–शंभू विचारांचे प्रतीकात्मक रूप : शिव–शंभूंच्या विचारांचे जागतिक प्रतीक असलेले “स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण” आणि जगद्गुरु तुकोबाराय संतपीठाची उभारणी — हे विकासाभिमुख हिंदुत्व.

4. शिक्षण, संविधान आणि गोसंवर्धन : आयआयएम, सीओईपीसारख्या शैक्षणिक संस्थांसह संविधान भवनाची उभारणी आणि गोसेवा–गोसंवर्धनाचा विचार म्हणजे विकासाभिमुख हिंदुत्व.

5. क्रीडा, पर्यावरण आणि जैवविविधता : आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी–कुस्ती संकुल, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या भावनेतून बायोडायव्हर्सिटी पार्कची संकल्पना — हे विकासाभिमुख हिंदुत्व.

6. शाश्वत विकासाचे स्पष्ट व्हिजन : गावठाणांचे संवर्धन आणि समाविष्ट गावांचा दीर्घकालीन, संतुलित विकास म्हणजे विकासाभिमुख हिंदुत्व

. 7. भक्तीमार्ग आणि नागरी विकासाची सांगड : वारकरी संप्रदायाचा भक्तीमार्ग, चऱ्होली–चिखली परिसराला ‘क-वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा आणि चिखली–मोशी–चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरचा विकास — हे विकासाभिमुख हिंदुत्व आहे, अशी सर्वसमावेशक व्याख्या करण्यात आली आहे.


“हिंदुत्व ही केवळ ओळख नसून ती आपल्या संस्कृतीची, मूल्यांची आणि राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे. विकासाशिवाय हिंदुत्व अपूर्ण आहे आणि हिंदुत्वाशिवाय विकास दिशाहीन ठरतो. पिंपरी-चिंचवडला विकास आणि संस्कृती यांचा समतोल साधणारे आदर्श शहर बनवण्यासाठी हे अभियान जनआंदोलन म्हणून राबवले जाईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात लोकसंपर्क अभियान राबवण्याच्या सूचना आहेत. त्याअनुशंगाने ‘‘विकासाभिमूख हिंदुत्व जागृती अभियान’’ राबवतो आहेत. आपल्या भावी पिढ्यांसाठी, शहराच्या प्रगतीसाठी पिंपरी-चिंचवडकरांनी या अभियानात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 22
Tags: #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: आमदार अमित गोरखे यांची हिवाळी अधिवेशनात प्रभावी कामगिरी; सामाजिक न्याय, शहर सुरक्षेपासून पर्यावरणापर्यंत ठोस भूमिका
Next: मोकाट श्वानांना अन्न देणाऱ्या नागरिकांनी अर्ज सादर करावेत; महापालिकेचे आवाहन

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.