Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • धोरणात्मक निर्णय; सोसायटीच्या ”एनओसी”शिवाय दारू दुकानांना परवानगी नाही-आमदार शंकर जगताप
  • Daily Breaking News
  • Poilitical

धोरणात्मक निर्णय; सोसायटीच्या ”एनओसी”शिवाय दारू दुकानांना परवानगी नाही-आमदार शंकर जगताप

suwarna gaware 11/12/2025
98e4bd29-cd8c-42ce-b66c-e83302a84230
Spread the love

स्थलांतरित परवान्यांसाठीदेखील कठोर अटी शर्ती लागू- आमदार शंकर जगताप

रहिवासी भागामध्ये दारू दुकानांना परवानगी देणाऱ्या ‘ त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

काळेवाडी–रहाटणी परिसरातील दोन दारू दुकानांचे परवाने निलंबित

पिंपरी–चिंचवड, ता. ११ : काळेवाडी–रहाटणी परिसरातील दोन दारू दुकानांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने नवीन जागा मिळेपर्यंत निलंबित केले आहेत. याच प्रश्नावरून आमदार शंकर जगताप यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दारू दुकानांसाठी कडक नियमावली देखील सभागृहासमोर ठेवली आहे.

यापुढे सोसायटीच्या एनओसी शिवाय दारू दुकानांना परवानगी मिळणार नाही. मुख्य म्हणजे निलंबित करण्यात आलेल्या दारू दुकानांना नवीन जागेत स्थलांतर करण्यासाठी सोसायटी किंवा ज्या जागेवर दुकान सुरू करायचे आहे त्याच जागेची शहानिशा करून संबंधित अधिकारी संस्थेकडून एनओसी घ्यावी लागणार आहे असे देखील स्पष्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान रहिवासी भागामध्ये दारू दुकानांना परवानगी देणाऱ्या महापालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘ त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील सभागृहात देण्यात आले आहेत.

आमदार शंकर जगताप म्हणाले चिंचवड मतदार संघात येणाऱ्या काळेवाडी रहाटणी परिसरातील सह्याद्री सरकारी गृहरचना संस्था ,अनंत पार्क काळेवाडी, शिवतीर्थ सहकारी गृह रचना या श्रीनगर रहाटणी या परिसरातील नागरिकांनी विक्रांत वाईन शॉप आणि बजाज देशी दारू दुकान या दोन दुकानात संदर्भात वारंवार तक्रार केली होती. सह्याद्री सरकारी गृहसंस्थेच्या रहिवासी इमारतीच्या बिल्डिंगमध्ये पूर्णत्वाचा दाखला नसताना व्यापारी गाळ्यामध्ये विक्रांत वाईन शॉप या दुकानाच्या माध्यमातून दारू विक्री होत होती.

तसेच शिवतीर्थ सहकारी गृह संस्थेच्या गेटलगत बजाज देशी दारू दुकान चालवले जात होते . या दुकानाच्या माध्यमातून दारू विक्री सर्रास केली जायची. येथे दारू पिऊन धिंगाणा घातला जात होता. ज्यामुळे महिला भगिनींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. येथे वारंवार आरडाओरडा भांडण होत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. मद्यपीमुळे अनेकदा अपघातांचाही घटना घडल्या होता.

यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. याबाबत सभागृहाला आज अवगत केले. यानंतर सभागृहामध्ये या मुद्द्याला गांभीर्याने घेत दारू दुकानांबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.


अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला व एनओसी शिवाय नियमबाह्यरित्या दारूचे दुकान सुरू करण्यास परवानगी देणारे महापालिका अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले.

…….

काळेवाडी–रहाटणी परिसरातील दोन दारू दुकानांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने नवीन जागा मिळेपर्यंत निलंबित केले आहेत. हे दारू दुकान असलेल्या मारतीला पूर्णत्वाचा दाखला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात आलेला नव्हता. त्या दुकानावर कारवाई करून त्या दुकानांचे नवीन जागेत स्थलांतर होईपर्यंत या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत.

विशेष म्हणजे असे निलंबित केलेले परवाने यापुढे नव्याने स्थलांतरित करीत असताना ज्या जागेमध्ये हे दुकान स्थलांतरित होणार आहे. त्या जागेची शहानिशा करावी लागणार आहे. दुकान सोसायटीच्या आवारात स्थलांतरित होत असेल तर संबंधित दुकान मालकाला सोसायटीची एनओसी घ्यावी लागणार आहे. एनओसी असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत दारूचे दुकान त्या ठिकाणी सुरू करता येणार नाही. असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

शंकर जगताप

आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर


suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 27
Tags: #shankar jagtap #चिंचवड #हिवाळी अधिवेशन Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: नागपूर अधिवेशन : पुरवणी मागण्यांमध्ये आमदार महेश लांडगे ‘‘दस कदम आगे’’
Next: पुणे महानगर क्षेत्रातील मलनि:सारणाच्या 1209.08 कोटींच्या कामांना मान्यता

Related Stories

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 1

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 2

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 3

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 4

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 5

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.