


संविधान सन्मान मेळावा उत्साहात.

पिंपरी दि. २६ – भारत हे एक स्वतंत्र, सार्वभौम गणराज्य घोषित केले कारभारासाठी घटना तयार करण्यात आली कायद्याप्रमाणे त्यांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होईल, सार्वभौम भारत, घटक राज्य आणि शासनाचे विविध घटक आपली सत्ता आणि अधिकार जनतेतून प्राप्त करतील भारताच्या सर्व लोकांना कायद्याच्या,समाजाच्या नितीनियमांच्या कक्षेत सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय हक्क मिळवून देणारे भारतीय संविधान प्रास्ताविकेचे कष्टकरी कामगारांच्या वतीने सामूहिक वाचन करण्यात आले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला. कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार,फेरीवाला, रिक्षा चालक, घरेलू कामगार आदि असंघटित कामगारांच्या लक्षणीय उपस्थितीमध्ये थरमॅक्स चौक चिंचवड येथे संविधान दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, प्रदेश संघटक भास्कर राठोड, अनिल जाधव, सुनील भोसले,रोहन मुरगुंड, लता चव्हाण, अश्विनी गावडे, सुधीर मोरे,वंदना देसाई, अनिता कोरे राधा भोसले आदी सह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नखाते म्हणाले की संविधानात राज्यव्यवस्थेसाठी ची मार्गदर्शक तत्वे महत्त्वाचे आहेत त्यात गरीब – श्रीमंताच्या मधील दरी कमी करण्याची जबाबदारी स्पष्टपणे राज्य सरकारावर टाकण्यात आलेली आहे. मोफत आणि सकस शिक्षण, हाताला रोजगार मिळावा आणि उपजीविकेच्या साधनांचे न्याय वितरण व्हावे असे मार्गदर्शन घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे केले आहे . मात्र आज नागरिकांना आणि कामगारांना हक्कासाठी झगडावे लागत आहे हा संघर्ष सुरूच राहील .
प्रास्ताविक लाला राठोड यांनी केले तर आभार किरण साडेकर यांनी मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
