


पिंपरी चिंचवड, ता. २६: पिंपरी येथील अशोक चित्रपट गृहाच्या आवारात साधू टि एल वासवानी यांच्या १४६ व्या जयंती निमित्त दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता विनम्र आदरांजली वाहण्यात आली.

सामाजिक समरसता, बंधुता, आणि इतर समाजबांधवांशी सामाजिक सलोखा असला पाहिजे असा मंत्र साधु टि एल वासवानी यांनी समाजाला दिला आहे असे पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी यांनी बोलताना सांगितले. तसेच या मंत्राच्या मार्गावरच समाजातील पुढील पिढीने वाटचाल केली पाहिजे असे ही सांगितले.
या वेळी पुष्पा पमनानी बोलताना सांगितले की २५ नोव्हेंबर हा दिवस सिंधी समाजातील बाधंव शाकाहारी दिवस म्हणून साजरा करतात.
यावेळी पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी,पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश हेमनानी, पिंपरी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परमानंद जमतानी,हंशींराम हरजानी, सुशिल बजाज, नारायण भागचंदानी, सुशिल पारवानी, अजित कंजवानी, तुलसीदास तलरेजा, प्रदीप नचनानी, हिरालाल रिझवानी, रेश्मा खयानी, रवीना कृपलानी, किरण रामनानी, पुष्पा पमनानी,दिव्या भगत,अवध दादा जेठवानी, अशोक खेमचंदानी,महेश खेमचंदानी,रानी दासवानी, हेमंत राजेश, जाॅनी थडानी,सुरिंदर मंघनानी,मनोज पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते चा संस्थेच्या पदाधिकाऱ्यां हस्ते सिंधी समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते यांचे विषेश स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय सिंधू सभा पिंपरी शाखेच्या वतीने करण्यात आले होते.तसेच या वेळी सिंधी समाज बांधवांसाठी सिंधी भाषेतील “कर्ज” या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.
अशी माहिती मनोहर जेठवानी यांनी दिली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
