Skip to content
02/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • कार्यकर्त्यांच्या बळावर “अब की बार 100 पार” – शंकर जगताप
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

कार्यकर्त्यांच्या बळावर “अब की बार 100 पार” – शंकर जगताप

suwarna gaware 24/11/2025
7ef0c2e1-c298-43fe-913c-04d6f6735fe1
Spread the love


 आमदारपदाची वर्षपूर्ती आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शंकर जगताप यांचा निर्धार


पानी व्यवस्थापन आणि नदी सुधारवर “फोकस” – शंकर जगताप
थेरगावातील कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी 23 नोव्हेंबर (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकीय जीवनाचा प्रवास 2007 पासून सुरू झाला . त्यानंतर अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर पडत गेल्या.  या जबाबदाऱ्यांना कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले.  तुम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम केले.  माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात . यामुळे प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी खंबीरपणे उभा राहिलो .

याच कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ”अब की बार 100 पार” हा नारा आपल्याला पूर्ण करायचा आहे असा निर्धार थेरगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केला.

थेरगावच्या याच व्यासपीठावर पुढील वर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही वर्षपूर्तीचा सोहळा आपण साजरा करू असा संकल्प देखील या निमित्ताने करण्यात आला.


आमदार शंकर जगताप यांच्या आमदारपदाची  वर्षपूर्ती तसेच पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल थेरगाव, कामगार भावन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मंडलाध्यक्षांच्या तसेच प्रभागातील सदस्यांच्या वतीने आमदार शंकर जगताप यांना सन्मानित करण्यात आले.

मेळाव्याला विधान परिषद आमदार उमा खापरे, अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे,  माजी महापौर माई ढोरे,  भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाता पालांडे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, तुषार हिंगे,  युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, सचिन साठे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, स्थायी  समितीचे माजी अध्यक्ष विलास मडेगिरी, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, ज्येष्ठ उद्योजक उमेश चांदगुडे तसेच भाजपचे सर्व जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, मंडळ प्रमुख, मंडल कार्यकारणी सदस्य प्रभाग अध्यक्ष, बुधप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते या निमित्ताने उपस्थित होते. कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने महापालिका निवडणुकांसाठी मोठे शक्ती प्रदर्शन या निमित्ताने पाहायला मिळाले .

यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.  या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपल्याला सामोरे जायचे आहे असे सांगून जगताप म्हणाले, की 2007 ते 2012 या कालावधीत मी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला.  या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केले.

मात्र 1992 पासूनच  दिवंगत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासोबत राजकारणाचे धडे गिरवले आहेत. त्यावेळी पडद्यामागे आम्ही काम करत होतो. 

लक्ष्मणभाऊ तेव्हा नेहमी म्हणायचे की, ” माझे भाऊ कार्यकर्त्यांप्रमाणे काम करतात आणि कार्यकर्ते मला भावासारखे आहे.” हे वाक्य माझ्या मनात तेव्हापासून अक्षरशः कोरले गेले आहे. कार्यकर्ते माझे पाठीराखे, अगदी माझ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांच्या पाठबळावरच आज हा महत्वाच्या टप्पा मी पूर्ण केला आहे.

शंकर जगताप पुढे असेही म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की जो तुमच्यातील गुणांना, कष्टाला आणि तुमच्या प्रामाणिकतेला नेहमीच दाद देतो.  पिंपरी चिंचवड मधील उमा खापरे, अमित गोरखे या कार्यकर्त्यांना आमदार बनवून भाजपने हे सिद्ध केले आहे . तुमच्या सारखे देवदुर्लभ  कार्यकर्ते आहोत. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण 100 सदस्य संख्या नक्की पार करू याची खात्री आहे.  असेही जगताप म्हणाले.  

आगामी काळात पाण्याचे नियोजन आणि  नदी सुधारवर ”फोकस” : आमदार जगताप

यावेळी शंकर जगताप यांनी सांगितले, आमदार म्हणून काम करताना नागपूर हिवाळी अधिवेशनात निळी पूररेषा, अनधिकृत बांधकामांचा  प्रश्न उपस्थित करून सरकारला वेळोवेळी नागरिकांच्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडले. आरक्षित जागांवरील ताबेदार नागरिकांना सातबारा व प्रॉपर्टी कार्ड देण्याची मागणी केली.  ग्राहक सुविधा ,वीजपुरवठा सुधारणा, सांगवी उपविभाग पुनर्रचनेबाबत आवाज उठवला . आमदार आपल्या दारी हा नागरिकांशी थेट संवादात्मक उपक्रम मी हाती घेतला.

या  माध्यमातून 13 प्रभागांमधून जवळपास 5 हजाराहून अधिक प्रश्न सोडविले. राज्य व  केंद्र सरकारच्या ताब्यातील रस्त्यांच्या कामाबाबत वेळोवेळी आढावा घेतला . हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक समस्या, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील अपघात नियंत्रणावर ठोस उपाययोजनांबाबत मागणी केली आहे.  वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत येथील राष्ट्रीय महामार्गावर प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीबाबत आढावा बैठक घेतली.

 महामार्गावर सेवा रस्त्यांची रुंदी वाढवण्यासाठी निविदा मंजूर करून घेतली असून आज सेवारस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे .  प्रस्तावित भक्ति शक्ति  ते रावेत, वाकड, भोसरी, मोशी ते चाकण असा मेट्रोचा डीपीआर शासनाला दिला आहे. या कामांमुळे लवकरच वाहतूककोंडीचा प्रश्न कायम मिटेल असा मला विश्वास आहे. याशिवाय आता २०५१ ची लोकसंख्या लक्षात घेऊन मुळशी धरणातून ७६० एम.एल.डी अतिरिक्त पाणी साठा उचलण्याबाबत जलसंपदा मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

 एस.टी. महामंडळासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आगार, शहरात विविध ठिकाणी अर्बन स्ट्रीट प्रकल्प उभारायचे  आहेत.  पवना, मुळा, इंद्रायणी नदी संवर्धनसाठी माझे प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत. या तीनही नद्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे.  यासाठी नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून यामुळे आगामी काळात चिंचवडचा चेहरा मोहरा बदलणार आहे. 
 ————————————————————
 कार्यकर्त्यांच्या संघटनातून पालिका निवडणूक यशस्वी करू

भारतीय जनता पक्षाने पडद्यामागे काम करणाऱ्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला विश्वासाने संधी दिली. या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न केला आहे. चिंचवड विधानसभा प्रभारी तसेच शहराध्यक्ष म्हणून काम करताना मी एक लाख 61 हजार सदस्य नोंदणी केली. जिल्ह्यातील नोंदणीचा हा उच्चांक होता.  त्यामुळे पक्षाने पिंपरी चिंचवड निवडणूक  प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. हे काम माझ्या एकट्याचे नव्हते.  याच्यामध्ये तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनीच हातभार लावला. आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे संघटन महत्त्वाचे आहेत या दृष्टीने पुढे काम करायचे आहे. याच संघटनाच्या माध्यमातून पुढील वर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही वर्षपूर्तीचा सोहळा आपण थेरगाव मधील याच मंचावर साजरा करून असा संकल्पही या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. 

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 20
Tags: #bjp #election #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
Next: सुमारे ३८३४० हजार जणांनी एकाच वेळी,एकाच ठिकाणी मतदान करण्याची विक्रमी शपथ घेत मतदान करण्याचा केला निर्धार…

Related Stories

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 1

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 2

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026
अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’! 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 5

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

24/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
  • अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.