Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महानगरपालिकेने वाकड येथे उभारलेल्या पाण्याच्या टाकीमुळे वाकड परिसरातील विविध भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार – आमदार शंकर जगताप
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महानगरपालिकेने वाकड येथे उभारलेल्या पाण्याच्या टाकीमुळे वाकड परिसरातील विविध भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 21/11/2025
a3481aa3-0e3e-4ef7-a5d9-55f1653aeb3d
Spread the love

वाकड परिसरातील कावेरीनगर येथे उभारण्यात आलेल्या २५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन….

पिंपरी, २१ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वाकड परिसरातील कावेरीनगर येथे २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून आजपासून पाणीपुरवठा देखील सुरू करण्यात आला आहे. या पाण्याच्या टाकीमुळे वाकड परिसरातील कस्पटेवस्ती, पिंक सिटी रस्ता परिसर, वेणूनगर, कावेरीनगर, पोलीस कॉलनी, दत्त मंदिर रस्ता आदी परिसरातील गृहसंकुले अशा विविध भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

कावेरीनगर,वाकड येथील वॉर्ड क्र. ५३, स. नं. २०८ मध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ५ कोटी ८५ लाख रू.खर्च करून उभारण्यात आलेल्या २५ लाख लिटर्स क्षमतेच्या पाण्याची उंच टाकी व संपवेलचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसदस्य विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, आरती चौंधे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, अनिल भालसाखळे, क्षेत्रीय अधिकारी आश्विनी भोसले, कार्यकारी अभियंता महेश बरिदे, महेश कावळे, हेमंत देसाई, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता प्रविण धुमाळ, मनोज बोरसे, विश्वनाथ पाडवी,अमरजित म्हस्के,सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अनिल देशमुख,अध्यक्षा वृषालीताई मरळ, ग्लेग इंजिनिअर्सचे मोहनलाल शर्मा, यांच्यासह ज्येष्ठ नागरिक,विविध सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेने कावेरीनगर परिसरात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे काम उच्च दर्जाचे केले आहे. शहरातील नागरिकांना चांगले रस्ते, मुबलक पाणी, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते.

स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा देशात नावलौकिक आहे. आपल्या शहराचा झपाट्याने विकास होत असून शहराची लोकसंख्या देखील जवळपास ३५ लाखांपर्यंत गेली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून येणाऱ्या काळात शहरातील सर्व नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यांना राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आमदार शंकर जगताप बोलताना म्हणाल

आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून वाकड परिसरात २५ लाख लिटरची पाण्याची टाकी उभी राहिली आहे. यामुळे विविध भागातील पाणीपुरवठा सुरळित होईल. शहरातील प्रत्येक नागरिकासाठी मुबलक पाणीपुरवठा मिळणे ही महत्त्वाची बाब असते, त्यामुळे शहरामध्ये होणारा पाणीपुरवठा हा मुबलक व सुरळित होणे आवश्यक असते. यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सातत्याने विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत.-

-विजयकुमार खोराटे
अतिरिक्त आयुक्त

नवीन पंप हाऊसची उभारणी

कावेरीनगर येथे उभारण्यात आलेली नवीन टाकी नियमितपणे भरून परिसराला सुरळित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने येथे नवीन पंप हाऊस उभारण्यात आले आहे. ही टाकी भरण्यासाठी पंपिंग मशिनरी व विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी ५० एचपी क्षमतेचे २ वर्किंग आणि १ स्टँडबाय पंप बसवण्यात आले आहेत,त्यामुळे ही संपूर्ण टाकी ६ तासातच भरणार आहे.

या पंप हाऊससाठी २०० केव्हीए स्वतंत्र वीज भार मंजूर असून त्यासाठी स्वतंत्र २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र संच व उच्च दाब नियंत्रणासाठी २ आरएमयू देखील बसविण्यात आले आहेत.

अनिल भालसाखळे
सह शहर अभियंता (विद्युत)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी आभार मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 28
Tags: #shankar jagtap #wakad #water #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: तळवडेतील मतदारांची नावे चिखलीत;माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी केली प्रशासनाची कानउघाडणी
Next: भाजप पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.