


प्रति,
मा. मुख्य संपादक/ पत्रकार बंधू-भगिनी,

सादर प्रणाम..!
इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रतिवर्षी आयोजित केला जाणारी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ यंदा अधिक भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात होत आहे. गतवर्षी या उपक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होऊन हा उपक्रम जागतिक पातळीवर गौरवला गेला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरत आहे. यंदा या सायक्लोथॉनमध्ये सुमारे ३५,००० सायकलपटू सहभागी होत असून हा उपक्रम एक भव्य पर्यावरण जनजागृती सोहळा ठरणार आहे. या कार्यक्रमाचे प्रभावी वृत्तांकन व्हावे यासाठी आपला प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
📅 दिवस: रविवार, २३ नोव्हेंबर २०२५
⏰ वेळ: सकाळी ६.०० वा.
📍 प्रारंभ स्थळ: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे.
🗒️ संपर्क: श्री. संजय पटनी : 98222 17163
📍 कार्यक्रम स्थळी पोहोण्यासाठी गुगल मॅप :
https://maps.app.goo.gl/oPsVm1hdiaKkDcicA
आपला स्नेहांकीत,
महेश किसनराव लांडगे
अध्यक्ष, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आमदार, भाजपा, पिंपरी–चिंचवड, पुणे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
