


पिंपरी चिंचवड, ता. १८: आजच्या काळात स्तन कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. विशेषतः 35 वर्षांवरील महिलांमध्ये या आजारांचे प्रमाण अधिक आढळते.

महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे तपासणी शिबिर लोकमान्य हॉस्पिटल कुटुंब फाउंडेशन आणि प्रभाग क्र. 12 मधील महिला बचत गट यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर मा. नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर आणि मनेश पंडित भालेकर यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आले आहे.
प्रभाग क्र. 12 मधील सर्व माता भगिनींना या योजनेचा आणि शिबिराचा नक्की लाभ घ्यावा. कारण लवकर तपासणी झाल्यास सुरक्षित आणि निरोगी आयुष्य जगणे अधिक शक्य होते.
थोडा वेळ स्वतःसाठी काढून या शिबिरात अवश्य सहभागी व्हा, तपासणी करून घ्या आणि याविषयी जागरूकता वाढवा. आपले आरोग्य ही आपली स्वतःची जबाबदारी आहे आणि अशी संधी मोफत मिळत असेल तर सर्व महिलांनी जरूर सहभागी व्हावे तसेच इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
