


पिंपरी चिंचवड, ता. १: प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ७ आणि ८ नोव्हेंबर २०२५ रोजी कॉसमॉस डोम प्लॅनेटेरियम टीमतर्फे विशेष विज्ञान उपक्रम “स्पेस का सफर”आयोजित करण्यात आला. या डोम थिएटरमध्ये विद्यार्थ्यांना विश्वातील अद्भुत वर्च्युअल सफरीचा अनुभव घेता आला.

सत्रामध्ये तारे, ग्रह, आकाशगंगा आणि विविध अंतराळातील घटना यांची आकर्षक दृश्ये सादर करण्यात आली. ही सत्रे संवादात्मक आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत घेण्यात आली.
नर्सरी ते बारावी इयत्तेपर्यंतच्या १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व या शैक्षणिक कार्यक्रमाचा आनंद लुटला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकलेल्या विज्ञान व अंतराळ विषयक संकल्पना प्रत्यक्ष जीवनाशी जोडता आल्या.
प्रश्नमंजुषा आणि छोट्या चर्चांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि खगोलशास्त्राविषयीची जिज्ञासा आणखीन वाढली.
हा उपक्रम शिक्षण आणि मनोरंजनाचा सुंदर संगम ठरला तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अद्भुत जगाचा शोध घेण्यासाठी प्रेरणा दिली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
